Siolim church accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: सायकलवरून घरी चाललेल्या 10 वर्षांच्या मुलाला 'स्विगी'च्या डिलीव्हरी बॉयने दिली धडक

शिवोली चर्चजवळ अपघात; मुलगा गंभीर जखमी

Akshay Nirmale

Swiggy Dilevery Boy collide with 10 year boy on bicycle at Siolim Church: स्विगी या फूड डिलिव्हरी कंपनीचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असलेल्या एकाने कामावर असताना दुचाकीवरून जाताना थेट एका दहा वर्षांच्या मुलाला उडविल्याची घटना घडली आहे. शिवोली चर्चजवळ हा अपघात झाला.

अरहाना मोतिवाला असे जखमी मुलाचे नाव आहे. त्याचे वय दहा वर्षे असून तो फर्नांडिस वाडा, शिवोली येथे राहतो. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिवोली चर्चजवळ सायंकाळी हा प्रकार घडला. अरहान हा सायकलपटू आहे. तो सायकलिंग करतो. सायकलवर अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिकेही करतो. दरम्यान, आज रविवारी सायंकाळी अरहान सायकलवरून घरी जात असताना हा अपघात घडला.

प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार स्विगीचा डिलिव्हरी बॉय शिवोलीतील दांडो वाड्डो येथे जात होतो. तो अॅक्टिव्हा स्कूटर चालवत होता. त्याच्या दुचाकीची धडक अरहानच्या सायकलला बसली.

या धडकेत अरहान जखमी झाला. त्याला तत्काळ शिवोली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी आक्रमक होत संबंधित डिलिव्हरी बॉयला जाब विचारला. यावेळी स्थानिक लोक संतप्त झाले होते.

दरम्यान, हणजुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. पोलिसांनी या अपघाता पंचनामा केला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT