Goa Crime: पाजीफोंड हिंदू स्मशानभूमीजवळ पंच सदस्यासह एकावर हल्ल्यानंतर तणाव; 'चुन चुन के मारेंगे'ची धमकी...

7 जणांवर गुन्हा दाखल, पोलिस स्टेशनबाहेर गर्दी
Goa Crime:
Goa Crime:Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime: पाजीफोंड मडगाव येथील हिंदू स्मशानाजवळ पंच सदस्य साईश राजाध्यक्ष आणि आणखी एकावर हल्ला झाला आहे. सायंकाळी हा प्रकार घडला. दरम्यान, या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी 7 जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

अफजल शेख, जाफर खान, मंजुनाथ हरिजन, शाबुद्दिन काडोल, नासिर शेखर, निजाम बसू, जाफर बसू अशी संशयितांची नावे आहेत.

मारहाणीचा प्रकार समजतात मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष भाई नाईक यांनी कार्यकर्त्यांसह पोलिसांत धाव घेत दोषींवर कारवाईची मागणी केली. ते म्हणाले की, मला पावणेपाचच्या सुमारास येथील स्मशानातून फोन आला की, लवकर या मारहाण सुरू आहे.

आम्ही तिथे पोहचलो तेव्हा कळलेली हकिगत अशी की, काही लोकांनी थेट स्मशानातून घुसून दोघांना मारहाण केली. पंच सदस्य राजाध्यक्ष यांनी विचारणा केल्यावर त्यांनाही सर्वांनी मिळून मारहाण केली. दुसऱ्याने विचारणा केल्यावर त्यालाही मारहाण केली.

Goa Crime:
Goa Crime: कोलवाळ येथे दुचाकीवरून चाललेल्या 'कपल'ला तिघांची जबर मारहाण; कार आडवी घालून अडवले...

राजाध्यक्ष हे कसेतरे पोलिस स्टेशनात पोहचले. त्यांनी फातोर्ड्यात त्यांनी तक्रार केली. तर तिथेही हे मारहाण करणारे पोहचले होते आणि त्यांनी त्यांनाच मारहाण झाल्याचे पोलिसांना सांगितले.

भाई नाईक म्हणाले की, आम्हाला दुसऱ्या धर्माच्या स्मशानात प्रवेश आहे का? बाहेरून येऊन आमच्या स्मशनात घुसून मारहाण झालेली आहे. आज जर माघार घेतली तर पुढेही असाच त्रास सुरू राहील. ज्यांना विचारणा केली त्यांनाच मारहाण केली जात आहे.

हा त्रास हाताबाहेर गेला आहे. त्यांनी चुन चुन के मारेंगे अशी धमकीही दिली. असली दमदाटी आम्ही कधीच गोव्यात यापुर्वी ऐकलेली नाही. रागाच्या भरात कुणी काही केले असते तर कितीला पडले असते. आम्ही पोलिसांना विनंती केली की त्यांना जामिन देऊ नका.

माझी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनीही यात लक्ष घालावे आणि आम्हाला न्याय द्यावा.

Goa Crime:
Goa Night Life: देशाची पार्टी कॅपिटल असलेल्या गोव्यात नाईट लाईफच्या 'या' 4 गोष्टी करू नका मिस्स...

पंच सदस्य साईश राजाध्यक्ष म्हणाले की, पोलिसांना आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. राज्यातील नेत्यांनीही आम्हाला फोन करून तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे सांगितले आहे.

दुपारी चारच्या सुमारास घराकडे जात असताना पाजीफोंड हिंदू स्मशानभूमीत तिथे कचऱ्यावरून काहीतरी गोंधळ सुरू होता.

मी विचारणा केल्यावर संबंधित व्यक्तीने कुणाला तरी फोन करून बोलवून घेतले. त्यानंतर दहा ते बारा मुलांनी रॉड, चॉपरने दोघांवरही हल्ला केला. गळ्यातील चेन हिसकावली, पैसेही काढून घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com