मडगाव: आमदारांनी गद्दारी करून पक्ष सोडला असे म्हणत गळा काढून रडून लोकांची सहानुभूती घेण्याऐवजी काँग्रेसने हिंमत असल्यास जे आमदार शपथपत्र मोडून दुसऱ्या पक्षात गेले आहेत. त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करा असे आव्हान आज आम आदमी पक्षाने दिले.
(Goa AAP said files FIR against Congress MLAs for breaking affidavit)
काँग्रेस पक्षाचे आठ आमदार पक्ष सोडून भाजप पक्षात गेले याचा निषेध करण्यासाठी आज आप कार्यकर्त्यांनी येथील मडगाव लोहिया मैदानावर निषेध सभा आयोजित केली होती. यावेळी बोलताना बाणावलीचे आमदार वेन्झी विएगस यांनी हे आव्हान दिले. यावेळी आपच्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार व्हिएगस यांनी सांगितले कि, काँग्रेस पार्टीला गोव्यातून हद्दपार करायला हवे. काँग्रेस पार्टीला त्यांच्या उमेदवारावर विश्वास नव्हता म्हणून त्यांच्याकडून शपथपत्र सही करून घेतले होते. देवासमोर पक्ष सोडणार नसल्याच्या शपथ घेण्यात आली तरी सुद्धा त्यांच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करून पक्षाचा आणि जनतेचा विश्वासघात केला. त्यामुळे जनतेने या पक्षावरच आता बहिष्कार घालायला हवा असे ते म्हणाले. हा काँग्रेस पक्ष म्हणजे राजकीय रोग असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी बोलताना प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या कि, काँग्रेस पक्ष भाजपाची बी टीम आहे. या पक्षाला मत देणे म्हणजे भाजपला मत देण्यासारखे आहे. या विषयी जनतेला आम्ही वारंवार सांगत आलो आहोत. मडगावचे आमदार सध्या देवाच्या प्रकरणामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असताना दिसत आहेत. त्यांनी 5 वर्षे मुख्यमंत्रीपद भोगले आहे.
तसेच विरोधी पक्षनेतेपदही सांभाळलेले आहे. अशाने त्यांना कसली अशा उरली आहे. असा सवाल त्यांनी केला. कामत यांना युवा नेते पुढे सरसावलेले आवडत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मडगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांनी विरोधी नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांच्याबाजूने क्रॉस वोटिंग करून चांगले काम केले असल्याचे त्या म्हणाल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.