Goa AAP Delegation In Delhi Election Dainik Gomantak
गोवा

Delhi Assembly Election: दिल्लीत धडाडणार गोव्यातील 'आप' नेत्यांची तोफ; निवडणुकीत केजरीवालांचे गोमंतकीय शिलेदार करणार प्रचार

Goa AAP Delegation In Delhi Election: केजरीवालांच्या प्रचाराला अधिक बळकटी देण्यासाठी आमदार क्रूझ सिल्वा यांच्या नेतृत्वाखाली गोवा आपचे एक शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झाले आहे.

Manish Jadhav

Goa AAP Delegation Joins Kejriwal’s Delhi Election Campaign

अरविंद केजरीवाल यांचे गोमंतकीय शिलेदार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. केजरीवालांच्या प्रचाराला अधिक बळकटी देण्यासाठी आमदार क्रूझ सिल्वा यांच्या नेतृत्वाखाली गोवा आपचे एक शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झाले आहे. त्यामुळे आता गोव्यातील आप नेत्यांची तोफ दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात धडाडणार हे नक्की. केजरीवाल हॅट्ट्रिक लगावण्यासाठी जीवाचं रान करत आहेत. केजरीवालांच्या विरोधात काँग्रेस आणि भाजपने मोर्चा खोलला आहे. खासकरुन इंडिया आघाडीतील मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसची जहरी टीका केजरीवालांना चांगलीच बोचत आहे.

नेत्यांसोबत कार्यकर्त्यांची फौज

दरम्यान, गोवा आप नेत्यांसोबत कार्यकर्ते देखील स्वखर्चाने दिल्लीत पोहोचले आहेत. तर काही कार्यकर्ते आगोदरच दिल्लीतील (Delhi) आप कार्यकर्त्यांबरोबर ग्राऊंडवर काम करत आहेत. दिल्ली आपच्या नेत्यांनी गोवा टीमला विशिष्ट कामे आणि मतदारसंघ नियुक्त करुन दिले आहेत, जेणेकरुन तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत ते प्रचार मोहिमेचे नेतृत्व करतील.

आप नेत्यांची दुसरी टीम लवकरच दिल्लीत पोहोचणार

आमदार वेंझी व्हिएगस यांच्या नेतृत्वाखालील गोवा आप नेत्यांची दुसरी टीम येत्या काही दिवसांतच दिल्ली मोहिमेत सामील होणार आहे, ज्यामुळे पक्षाच्या प्रचाराला डबल बळ मिळेल. दरम्यान, गोवा (Goa) आपचे कार्यकारी अध्यक्ष गर्सन गोम्स यांनी गोव्यातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यासोबत दिल्लीत एक मजबूत आणि चपळ कार्यकर्त्यांची फौज पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

Rahul Gandhi: 'केवळ रस्त्यावर उतरुन सत्तापालट होत नाही', 'अच्छे दिन'च्या धर्तीवर 2029 साठी राहुल गांधींचा प्लॅन काय? 12 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT