
Education Report Goa AAP Allegations
पणजी: केंद्र सरकारच्या शिक्षण खात्याने नुकत्याच जारी केलेल्या अहवालामुळे गोव्यातील भाजप सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे. या अहवालामुळे राज्यातील सरकारी शाळांत मूलभूत सुविधांचा किती वाणवा आहे, हे यावरून स्पष्ट झाल्याचा आरोप ‘आप'' नेते रामराव वाघ यांनी केला.
पणजीत आपच्या कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत वाघ बोलत होते. यावेळी सलमान खान व रॉक मास्कारेन्हास उपस्थित होते.
वाघ म्हणाले की, केंद्रीय अहवालानुसार राज्यात एकूण १ हजार ४८७ शाळा आहेत. यामध्ये ७८९ सरकारी शाळा आहेत. सरकारी शाळेत संगणकाचे प्रमाण केवळ २१ टक्के आहे. सध्याच्या युगात संगणक ही गरज बनलेली असताना केवळ २१ टक्के सरकारी शाळेत संगणक उपलब्ध असणे, ही धक्कादायक बाब आहे. याउलट राज्यातील ९५ टक्के अनुदानित शाळेत संगणक सुविधा उपलब्ध आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.