Babashan activists  Dainik Gomantak
गोवा

Goa: आप आणि बाबाशान कार्यकर्ते पुन्हा भिडले

बाबाशानच्या कार्यकर्त्यांनी (Babashan Activists) आपच्या कार्यकर्त्यांना आर्वाच्च शिवीगाळ दिल्याचा दावा करीत करुन बाबाशान यांनी माफी मागावी, अशी मागणी घेऊन आप कार्यकर्त्यांचा झुंड आज बाबाशानच्या घरी पोहचला.

दैनिक गोमन्तक

सासष्टी : आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) उपाध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो (Pratima Coutinho) यांच्या नेतृत्वाखाली काल कॉग्रेस (Congress) पक्षातून फुटून भाजप पक्षात गेलेल्या दहा आमदारापैकी नुवेचे आमदार बाबाशान डिसा (Babashan Disa) यांना केक देण्यासाठी गेले होते. पण, यात बाबाशानच्या कार्यकर्त्यांनी आपच्या कार्यकर्त्यांना आर्वाच्च शिवीगाळ दिल्याचा दावा करीत करुन बाबाशान यांनी माफी मागावी, अशी मागणी घेऊन आप कार्यकर्त्यांचा झुंड आज बाबाशानच्या घरी पोहचला. त्यामुळे बाबशानचे कार्यकर्ते आणि आपचे कार्यकर्ते पुन्हा थेट एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळालं. नंतर पोलिसांना मध्यस्थी करुन आप कार्यकर्त्यांना हटविले.

कॉग्रेस पक्षातून फुटून भाजप पक्षात गेलेल्या दहाही आमदारांना केक देण्यासाठी काल आम आदमी पक्षाचे कार्यकर्ता गेले होते. नुवेचे आमदार विल्फ्रेड (बाबाशान) डिसा यांना केक देण्यासाठी गेले असता, आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाबाशान यांच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करुन केल्याचा दावा करीत आप आदमी पक्षाचे अध्यक्ष रुपेश म्हांबे, उपाध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो आणि आपच्या कार्यकर्त्यांनी बाबाशान यांच्या घरी पोहचून माफी मागण्याची मागणी केली.

आप कार्यकर्त्यांचा झुंड एकत्र झाल्यावर बाबाशान कार्यकर्ते आक्रमक झाले. नंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दोन्हीही कार्यकर्त्यांना हटवून स्थिती नियंत्रणात आणली. यावेळी आमदार बाबशनसह त्यांच्या पत्नी फ्रिडा डिसा, वेर्णा, नुवे, लोटली, माजोर्डा, माजी जिल्हा पंचायत नॅली रोड्रीगीस व सर्व कार्यकर्ते त्यांच्या समर्थनास जमले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lotulim Shipyard Accident: नौका बांधताना उडाला आगीचा भडका, 5 जणांचा मृत्यू; ‘विजय मरीन’ च्या संचालकासह दोघे अटकेत

Water Shortage: 'पाणी येईपर्यंत गप्प बसणार नाही'! सावर्डेत 8 दिवसांपासून नळ कोरडे; ग्रामस्थांचा पाणीपुरवठा विभागाला इशारा

Goa Farmer Aid Fund: पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! भरपाईसाठी अर्ज करण्याचे आवाहन..

Goa Crime: धक्कादायक! नोकरी देतो सांगून करायचा अत्याचार, पीडित युवतींचा हवालासाठी ‘कुरियर गर्ल्स’ म्‍हणून करायचा वापर

Goa Electricity Tariff: घरगुती वीज ग्राहकांना दिलासा! वेळेनुसार दरवाढ तूर्त नाही; मंत्री ढवळीकर यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT