किनाऱ्यावर येणाऱ्या तेल गोळ्यांसंबंधी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने भक्त संतप्त झाले आहेत. Dainik Gomantak
गोवा

Goa: मिरामार किनाऱ्‍यावर मोठ्या प्रमाणात तेल गोळे आल्याने किनारा काळवंडला

गणपती विसर्जनाला अडथळे, जैवविविधतेला धोका (Threat to biodiversity), निसर्गसुंदर किनारा तेल गोळ्यांनी कालवंडल्यामुळे मिरामार (Miramar) किनाऱ्यावर येणारे पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत. एवढेच नव्हे, तर काही पर्यटक किनाऱ्यापर्यंत जाण्याचेही टाळत आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात गणेश उत्सवाचे उत्साही वातावरण असताना आणि दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होत असताना मिरामार (Miramar) किनाऱ्‍यावर मोठ्या प्रमाणात तेल गोळे (Oil balls) आल्याने गणेश भक्तांना यातून वाट काढत आज दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करावे लागले. वारंवार किनाऱ्यावर येणाऱ्या तेल गोळ्यांसंबंधी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने भक्त संतप्त झाले आहेत, तर दुसरीकडे यामुळे किनारपट्टीचे मोठ्या प्रमाणत नुकसान होत असून याचा किनापट्टीवरील  जैवविविधेलाही  धोका (Threat to biodiversity) निर्माण झाला आहे. 

गोवा पर्यटन विकास महामंडळाने किनाऱ्याची स्वच्छता करणे गरजेचे असताना अक्षम्य दुर्लक्ष झालेल्या दिसत आहे. या तेल गोळ्यांमुळे गणपती विसर्जन करण्यासाठी आलेल्या भक्तांचे पाय घाण होत असून तेल आणि माती मिश्रित काळे गोळे संपूर्ण किनारपट्टीवर पसरत आहेत, तर दुसरीकडे पर्यटकांनाही याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसत आहे. सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा आणि हे तेल गोळे त्वरित काढून किनारपट्टी स्वच्छ करावी अशी मागणी गणेश भक्तांकडून होत आहे.

पर्यटकांत नाराजी

मिरामार किनाऱ्यावर सर्वत्र तेल गोळे वाहून आल्याने पर्यटकांना या तेल गोळ्यांतून वाट काढत समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्यावा लागत आहे. किनाऱ्यावरून अथांग समुद्र नेहाळतानाच पायाखाली एकादा तेल गोळा तर नाही ना याची दक्षता घ्यावी लागत आहे. निसर्गसुंदर किनारा तेल गोळ्यांनी कालवंडल्यामुळे मिरामार किनाऱ्यावर येणारे पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत. एवढेच नव्हे, तर काही पर्यटक किनाऱ्यापर्यंत जाण्याचेही टाळत आहेत.

दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाचा दिवस असताना संपूर्ण मिरामार किनारपट्टीवर तेलाचे गोळे आल्याने आम्हाला गणपती विसर्जन करण्यासाठी यातूनच वाट काढावी लागत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने हे तेल गोळे काढून किनारपट्टी तातडीने स्वच्छ करावी.

- मंदार गावकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT