महिलेने मांडवी पुलावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. Dainik Gomantak
गोवा

Goa: पतीसोबत झालेल्या भांडणामुळे विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

भांडणामुळे रागाच्या भरात महिलेने मांडवी पुलावरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ती पतीसोबत गोव्यात भाडेतत्वावर राहते, काल रात्री त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले.

दैनिक गोमन्तक

पणजी : म्हार्दोळ (Mhardol) येथे राहत असलेल्या ओरिसाच्या विवाहितेने पतीबरोबर झालेल्या भांडणामुळे आज सकाळी ९ वाजता मांडवी पुलावरून (Mandvi Bridge) नदीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला. तिच्यासोबत असलेल्या शेजारी पुरुषानेही तिच्या पाठोपाठ उडी घेऊन तिला वाचवले. महिलेला गोमेकॉ इस्पितळात (Gomeco Hospital) दाखल करण्यात आल्याची माहिती पर्वरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक निनाद देऊलकर यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विवाहिता म्हार्दोळ येथे पतीबरोबर भाडेपट्टीच्या घरात राहते. काल रात्री त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे आज सकाळी तिचा पती रागाने घरातून कळंगुटला निघून गेला. त्याच्यापाठोपाठ तिनेही शेजाऱ्याच्‍या मदतीने दुचाकीने कळंगुटला जायता निघाली. मांडवी पुलावर तिने शेजाऱ्याला दुचाकी थांबवण्यास सांगतिले. दुचाकी थांबताच ती उतरली व सरळ पुलाच्या कठड्यावर चढून नदीत उडी घेतली. दुचाकी चालकाने क्षणाचा विलंब न लावता त्यानेही पुलावरून उडी घेतली.

पाण्यात उडी घेतल्याचे मालिम - बेती मच्छिमारी धक्क्यावर असलेल्या खलाशांनी पाहिले. नदीत उडी घेतलेल्या पुरुषाने त्या महिलेला पाण्यात पकडून ठेवून किनाऱ्यावर आणत असताना तेथे असलेल्या खलाशांनी तिला बाहेर काढण्यात मदत केली. पाण्यात गटांगळ्या खाल्ल्याने या विवाहितेला श्‍वाच्छोस्वास घेण्यास त्रास होत होता. लगेच १०८ रुग्णवाहिकेला बोलावून तिला गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. महिलेची प्रकृती सुधारत असून तिची जबानी नोंदवण्यात येणार असल्याचे निरीक्षक देऊलकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT