गोव्यात पेट्रोल डिझेलच्या दराचा भडका; गोवा कॉग्रेस करणार आंदोलन

गोव्यात (Goa) सध्या वास्कोमध्ये (Vasco) पेट्रोलचे (Petrol) दर 96.16 असून डिझेलचे (Diesel) दर 93.69 रुपये आहे.
Goa Petrol Pump
Goa Petrol PumpDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यामध्ये (Goa) वास्को (Vasco) शहरात जे पेट्रोलचे दर असतात ते मुळ दर असतात. कारण राज्याबाहेरून पेट्रोल इंधन गोव्यात सर्वात आधी वास्को मध्ये येते. वास्कोपासून ज्या ज्या शहराचं जेवढं जास्त अंतर असेल त्यानुसार त्या शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती ठरतात. गोव्यात पेडणे, पणजी, म्हापसा, आणि सगळ्यात जास्त दर काणकोण भागात असतात, कारण ते वास्कोपासून जास्त अंतरावर आहे. सध्या वास्कोत पेट्रोलचे दर 96.16 असून डिझेलचे दर 93.69 रुपये आहे. तर पणजीला पेट्रोलचे दर 96.70 आणि डिझेलचे दर 99.60 रूपये आहेत. (Fuel on boil: Petrol in Goa over Rs 96, diesel skyrockets)

दरम्यान इंधन दरवाढीविरोधातील (Petrol diesel price) राष्ट्रीय आंदोलनाचा एक भाग म्हणून राज्यात कॉंग्रेस (Goa Congress) आंदोलन करणार आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आल्तिन गोम्स (Altin Gomes) यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, 10 जुलैला मडगाव येथे, तर 16 जुलैला पणजी येथून सायकल फेरी काढण्यात येईल. त्याशिवाय पेट्रोल पंपांच्या ठिकाणी गट समित्यांच्या माध्यमातून इंधन दरवाढीविषयी ग्राहकांना अवगत करण्यात येईल.

Goa Petrol Pump
Goa: ऑक्सिजनअभावी झालेल्या कोरोना बळींच्या चौकशीस न्यायालयाचा नकार

ते पुढे म्हणाले, इंधन दरवाढीविरोधात स्वाक्षरी मोहिमही पक्ष राबवणार आहे. राज्य पातळीवर महागाईच्या विरोधात आमदार, प्रदेश पदाधिकारी यांच्या सहभागाने एक मोर्चा काढण्यात येणार आहे. कॉंग्रेसचे नेते सध्या राज्यभरात कोविड महामारीने मृत्यूमुखी पडलेल्यांचे सांत्वन करत असून त्यांना सरकारी मदत मिळावी यासाठी अर्जही भरून देत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Goa Petrol Pump
Goa Politics: "घोटाळा लपविण्यासाठी उर्फान मुल्ला भाजपमध्ये"

दरम्यान निवडणुका संपल्यानंतर लगेचच संपूर्ण देशात इंधन दरवाढीचा भडका उडाल्याचं पाहायला मिळत आहे. जवळपास 56 दिवस निवडणुकांचे बिगुल वाजताच देशातील इंधन दरवाढ थांबविण्यात आली होती. दरम्यान यामुळे तेल कंपन्यांवर मोठा आर्थिक बोजाही पडला होता. आता तीच आर्थिक तूट भरून काढण्याचा प्रयत्न तेल कंपन्या करत असल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे सरकार आता नेमका इंधन दरवाढीवर निर्णय घेणार का? किंवा येणाऱ्या काळात या किंमती कमी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com