unemployed PhD holders Goa Dainik Gomantak
गोवा

Unemployment In Goa: गोव्यात PhD धारकच बेरोजगार! बेकारांमध्ये बारावी झालेले आघाडीवर; पदवीधर दुसऱ्या स्‍थानी

Unemployed PhD holders Goa: राज्‍यात पीएचडी मिळवलेले ६५ जण बेरोजगार आहेत. तर, सर्वाधिक बेरोजगारांच्‍या यादीत बारावी झालेले (३८,१२२) अव्वल असून, त्‍यानंतर पदवीप्राप्‍त (३१,७९३) युवक–युवतींचा क्रमांक लागतो.

Sameer Panditrao

पणजी: राज्‍यात पीएचडी मिळवलेले ६५ जण बेरोजगार आहेत. तर, सर्वाधिक बेरोजगारांच्‍या यादीत बारावी झालेले (३८,१२२) अव्वल असून, त्‍यानंतर पदवीप्राप्‍त (३१,७९३) युवक–युवतींचा क्रमांक लागतो.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेत विचारलेल्‍या लेखी प्रश्‍नाला कामगार मंत्री बाबूश मोन्‍सेरात यांनी दिलेल्‍या उत्तरातून ही माहिती समोर आलेली आहे. राज्‍यातील हजारो तरुण दरवर्षी रोजगार विनिमय केंद्रात नोकरी मिळवण्‍यासाठी अर्ज करतात. तेथून प्राप्‍त झालेले जी आकडेवारी मंत्री मोन्‍सेरात यांनी उत्तरातून सादर केलेली आहे, त्‍यातून पीएचडी झालेले ६५ जण राज्‍यात बेरोजगार असल्‍याचे दिसून येते. या यादीत बारावी झालेल्‍यांची संख्‍या सर्वाधिक ३८,१२२ असून, त्‍यानंतर पदवी झालेल्‍या ३१,७९३ जणांचा क्रमांक लागतो.

राज्‍यातील बेरोजगारी कमी करण्‍यासाठी कामगार खात्‍यामार्फत कोणती पावले उचलण्‍यात येत आहेत, असा प्रश्‍न युरी आलेमाव यांनी विचारला होता. त्‍यावर मॉडेल करिअर केंद्रांची स्‍थापना करण्‍यात आली आहे. युवक–युवतींना कौशल्‍यपूर्ण शिक्षण दिले जात आहे. यूपीएससी, जीपीएससी, बँकिंग, रेल्वे आदींसारख्‍या स्‍पर्धा परीक्षांत गोमंतकीय विद्यार्थ्यांनी उतरावे, यासाठी त्‍यांना मार्गदर्शन करण्‍यात येत आहे, असे मंत्री मोन्‍सेरात यांनी म्‍हटले आहे.

राज्‍यातील बेरोजगार

शिक्षण संख्‍या

न शिकलेले ६११

सहावीपर्यंत १,१७२

नववीपर्यंत ७,४३९

दहावी १६,४८८

बारावी ३८,१२२

दहावीनंतर डिप्‍लोमा १,२७४

शिक्षण संख्‍या

बारावीनंतर डिप्‍लोमा ३,१३४

आयटीआय ७,९७५

पदवी १,७९३

पदव्‍युत्तर ८,९५५

पीएचडी ६५

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: गोव्यात विरोधक एकत्र येऊ शकतील?

Goa Bad Roads: खराब रस्ते रोजगार पुरवतात हे तुम्हाला माहिती आहे का? संपादकीय अग्रलेख

Mandrem: मांद्रेतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण! वाहनचालकांची होतेय कसरत; डिसेंबरनंतर होणार हॉटमिक्स डांबरीकरण

Bardez: बार्देशमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव! अपघातांत वाढ; शेतपिकाचेही होतेय मोठ्या प्रमाणात नुकसान

Russian Tourist: ..यंदा रशियन पर्यटक वाढणार? व्‍यावसायिकांची अपेक्षा; नेदरलँड, पोर्तुगाल, स्‍पेन आणि युकेकडेही लक्ष

SCROLL FOR NEXT