IFFI Delegate Registration Process  Dainik Gomantak
गोवा

IFFI Delegate Registration: तुमची उपस्थिती अगत्याची! 'इफ्फी'च्या प्रतिनिधी नोंदणीस सुरुवात; जाणून घ्या रजिस्ट्रेशन प्रक्रिया

गोमन्तक डिजिटल टीम

IFFI 2024 Delegate Registration Process in Marathi

IFFI Goa: यंदा गोव्यात ५५व्या IFFI चे आयोजन करण्यात येणार आहे आणि हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीसाठी मर्यादित असेल. जगभरातून विविध कलाप्रेमी यावेळी गोव्याला भेट देतील. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रतिनिधींची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. तुम्हाला देखील IFFI चा भाग बनायचं असेल तर नोंदणीची प्रक्रिया जाणून घ्या.

प्रतिनिधी म्हणून IFFI ची नोंदणी का करावी? ( Why to register as a delegate in IFFI?)

एक प्रतिनिधी म्हणून नोंदणी केल्यानंतर तुम्हाला चित्रपटांचे स्क्रीनिंग पाहण्याची आणि चित्रपट सृष्टीतल्या प्रमुखांना भेटण्याची संधी मिळते. चित्रपट सृष्टीत काय घडामोडी सुरु आहेत हे जाणून घेता येतं त्यामुळे अशी संधी कोणीही गमावू नये.

IFFI मध्ये प्रतिनिधी म्हणून नोंदणी कशी कराल? ( How to register as a delegate in IFFI?)

संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी सर्वात आधी https://iffigoa.org/ या वेबसाईटला भेट द्या. ही आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची अधिकृत वेबसाईट आहे.

वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला IFFI बद्दल थोडक्यात माहिती दिली जाईल आणि त्याच्याच खाली नोंदणीचे काही पर्याय दिलेले आहेत, पैकी पहिला पर्याय हा प्रतिनिधींच्या नोंदणीसाठी आहे. याला Delegate Registration For IFFI 2024 असं नाव देण्यात आलंय.

IFFI Delegate Registration

इथे तुम्ही प्रतिनिधी म्हणून का नोंदणी करावी या प्रश्नांच उत्तर दिलेलं आहे आणि त्याच्याच खाली Submit your entry now असा एक पर्याय सापडतो. हा पर्याय निवडल्यांनंतर तुम्हाला MyIFFI असं एक खातं तयार करावं लागेल.

हे खातं तयार झाल्यानंतर IFFI च्या कार्यक्रमांची यादी, तिकिटांची माहिती इत्यादी सर्व महत्वाच्या गोष्टी तुम्हाला समजतील. तुम्ही जर का हे खातं बनवलेलं असेल तर नवीन खातं उघडण्याची गरज नाही, साइन-इन करून पुढची प्रक्रिया सुरु करता येते. पासवर्ड लक्ष्यात नसल्यास Forgot Password म्हणून प्रक्रिया सुरु करा. या प्रक्रियेत अडचणी आल्यास registration@iffigoa.org वर ईमेल करण्याची सोया उपलब्ध आहे.

नवीन खातं कसं उघडाल? ( How to register a new account?)

नवीन खातं उघडताना I don't have an account चा पर्याय निवडा. इथे तुम्हाला नाव, ईमेल आणि पासवर्ड विचारला जाईल. सर्व माहिती समाविष्ट केल्यानंतर तुम्हाला IFFI नोंदणी झाल्याचा ई-मेल येईल. ई-मेल मध्ये दिलेला activate now हा पर्याय निवडून सर्वात आधी खातं सुरु करा यानंतर तुमचा ई-मेल आणि पासवर्ड टाकून नोंदणी सुरु करायची आहे.

IFFI Delegate Registration

नोंदणी सुरु करताना तुम्हाला तीन पर्याय दिले जातील. फिल्म प्रोफेशनल्स, सिने एन्थुसियास्ट आणि डेलिगेट स्टुडन्ट. या पर्यायांची फी वेगवेगळी आहे.

IFFI Delegate Registration

Film Professionals : 1180/-

सिनेमा, दूरदर्शन, रेडिओशी संबंधित व्यावसायिक किंवा चित्रपट आणि संस्कृतीवरील पुस्तकांचे लेखक आणि इतर साहित्यिक. रंगभूमीशी संबंधित व्यावसायिक आणि परफॉर्मिंग आर्ट्स क्षेत्रातील कलाकार यात नोंदणी करू शकतात.

  • पात्रता

चित्रपट क्षेत्रात व्यावसायिक दर्जा स्थापित करणारी प्रोफाइल असावी आणि सोबत सरकारचे ओळखपत्र असावे.

  • सुविधा

ऑनलाइन चित्रपटांचे व्यावसायिक मार्गदर्शन. दररोज 5 तिकिटांच्या मर्यादेसह ऑनलाइन विनामूल्य तिकीट बुकिंग.

  • नोंदणी शुल्क

रु.1000/- (अधिक 18% GST) online payable

IFFI Delegate Registration

Cine Enthusiast : 1180/-

एक चित्रपट शौकीन. FFI/ FFSI शी संलग्न सक्रिय सिने क्लबचे सदस्य.

  • पात्रता

स्वतःची प्रोफाइल असावी. पत्त्याच्या पुरावा म्हणून सरकारने जारी केलेले ओळखपत्र असावे.

  • सुविधा

दररोज 4 तिकिटांच्या मर्यादेसह ऑनलाइन विनामूल्य तिकीट बुकिंग.

  • नोंदणी शुल्क

रु.1000/- (अधिक 18% GST) Online Payable

IFFI Delegate Registration

Delegate Student : 0/-

भारतातील मान्यताप्राप्त संस्थांमधील फिल्म आणि मास कम्युनिकेशनचे विद्यार्थी ( संस्थेच्या प्रमुखाच्या पत्रासह)

  • पात्रता

विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे पत्र. महाविद्यालयचे ओळखपत्र. सरकारचे ओळखपत्र.

  • सुविधा

दररोज 4 तिकिटांच्या मर्यादेसह ऑनलाइन विनामूल्य तिकीट बुकिंग.

  • नोंदणी शुल्क

फी नाही.

IFFI Delegate Registration

यानंतर निवडलेल्या पर्यायानुसार तुम्हाला माहिती समाविष्ट करून हा फॉर्म सबमिट करावा लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा राजभाषा कायद्यात मराठी नको म्हणाणाऱ्या दामोदर मावजो यांची अभिजात दर्जानंतर पहिली प्रतिक्रिया; स्पृश्य - अस्पृश्यतेचा केला उल्लेख

Sand Mining: गोव्यात बांधकामांना आता 'अच्छे दिन' 'मांडवी', 'झुआरी'त रेती उपशास मुभा; दरावरही येणार नियंत्रण

कोने, प्रियोळ येथे भीषण अपघातात एक ठार; दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी 4 अपघात, गोव्यातील ठळक बातम्या

Goa News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्प्रिंगबोर्ड टॅबलेटचे वाटप

सुभाष वेलिंगकरांना अटक होणार का? गोव्यात कॅथलिक समाज आक्रमक, पोलिस स्थानकांवर निदर्शने

SCROLL FOR NEXT