IFFI 2024: उदयोन्मुख कलेला प्रोत्साहन देण्यासाठी 'IFFI' कडून नवीन विभागाची निर्मिती

IFFI in Goa: IFFI कडून भारतीय युवा चित्रपट निर्मात्यांसाठी नवीन विभागाची निर्मिती
IFFI in Goa: IFFI कडून भारतीय युवा चित्रपट निर्मात्यांसाठी नवीन विभागाची निर्मिती
IFFI 2024 Dainik Gomantak
Published on
Updated on

International Film Festival 2024

पणजी: गोव्यातील सुप्रसिद्ध चित्रपट महोत्सव म्हणजे IFFI. 20 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत गोव्यात IFFI चा कार्यक्रम पार पडणार आहे. देशातील विविध भागांमधून चित्रपटप्रेमी गोव्याला दरम्यान भेट देतील.

यंदाच्या वर्षी उदयोन्मुख कलेला प्रोत्साहन देण्यासाठी IFFI कडून भारतीय युवा चित्रपट निर्मात्यांसाठी एक नवीन विभाग तयार करण्यात आला आहे. "Best Debut Indian Film Section 2024" या विभागामधून नव्या दिग्दर्शकांना कथाकथनाचा अनोखा दृष्टिकोन मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल.

IFFI in Goa: IFFI कडून भारतीय युवा चित्रपट निर्मात्यांसाठी नवीन विभागाची निर्मिती
Goa Crime: फ्लॅट देण्याचे आश्वासन, होंडा सत्तरीत महिलेची 26 लाखांची फसवणूक

या नवीन विभागामधून देशभरातील कथाकथनाच्या विविध शैली दाखवल्या जातील आणि पैकी पाच निवडलेल्या चित्रपटांचे स्क्रीनिंग केले जाईल. एवढेच नाही तर यंदा "Best Debut Director of Indian Feature Film Award" असा विशिष्ट पुरस्कार देत नवीन चेहऱ्यांचा त्यांच्या कलेसाठी गौरव केला जाणार आहे.

IFFI कडून सादर करण्यात आलेल्या या नवीन विभागात सहभागी होण्यासाठी 23 सप्टेंबर 2024 पर्यंत प्रवेशिका भरल्या जाऊ शकतात. भारतीय चित्रपट सृष्टीला नवीन चेहरे मिळावेत आणि अनोख्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे म्हणून हा विभाग सुरु करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com