37th National Games Goa  Dainik Gomantak
गोवा

37th National Games: यजमानपदाची जबाबदारी सांभाळत 910 खेळाडूंची 92 पदकांची कमाई; सर्वोत्तम कामगिरी म्हणून नोंद

37th National Games: सर्वाधिक स्पर्धक यजमानांचे, दुसरा क्रमांक हरियानाचा

किशोर पेटकर

37th National Games: यजमान या नात्याने 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याचा सर्वाधिक खेळांत सहभाग होता, त्यामुळे त्यांच्या खेळाडूंचीही संख्या वाढली. राज्याचे 910 क्रीडापटूंनी प्रतिनिधित्व केले व एकूण 92 पदके जिंकण्यात यश मिळविले.

गोव्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना 27 सुवर्ण, 27 रौप्य व 38 ब्राँझपदकांची कमाई केली. इतर राज्यांतर्फे हरियानाच्या खेळाडूंचा सर्वाधिक सहभाग होता. या राज्याच्या एकूण 797 खेळाडूंची नोंदणी झाली.

तब्बल 29 वर्षांनंतर स्पर्धेत सर्वासाधारण विजेतेपद पटकावलेल्या महाराष्ट्राचे 761खेळाडू स्पर्धेत खेळले, तर दिल्लीचे पथक 568 खेळाडूंचे होते. तांत्रिक माहिती स्पर्धेच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नोंदीत करण्यात आली आहे.

एकूण 1880 पदके

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण 1880 पदकांसाठी 42 खेळांत क्रीडापटू मैदानात उतरले. यामध्ये 555 सुवर्ण, 546 रौप्य, तर 779 ब्राँझपदके होती. महाराष्ट्राने 80 सुवर्ण, 69 रौप्य, ७९ ब्राँझ मिळून सर्वाधिक 228 पदके प्राप्त केली.

दुसरा क्रमांक सेनादलास मिळाला. त्यांनी ६६ सुवर्ण, २७ रौप्य व ३३ ब्राँझ मिळून एकूण १२६ पदकांची कमाई केली. हरियानाला पदकतक्त्यात तिसरा क्रमांक मिळाला. त्यांनी ६२ सुवर्ण, ५५ रौप्य व ७५ ब्राँझ मिळून एकूण १९२ पदके जिंकली.

पुरुष खेळाडू जास्त

गोव्यातील ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण सहभागी खेळाडूंत पुरुष क्रीडापटूंची संख्या जास्त ठरली. स्पर्धेत ५३८० पुरुष, तर ४७६४ महिला क्रीडापटू खेळले. स्पर्धेत २२५४ तांत्रिक अधिकारी, २४९६ सपोर्ट स्टाफ आणि ४३५६ स्वयंसेवकांची नोंदणी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

SCROLL FOR NEXT