Blitz Chess Tournament: ऋत्विजचा ब्लिट्झ बुद्धिबळात धडाका

Blitz Chess Tournament- पणजीतील गोमंतक मराठा समाजाच्या राजाराम स्मृती सभागृहात स्पर्धा सुरू आहे
Blitz Chess Tournament
Blitz Chess TournamentDainik Gomantak
Published on
Updated on

Blitz Chess Tournament तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेने घेतलेल्या सुनंदाबाई दयानंद बांदोडकर स्मृती मानांकन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत फिडे मास्टर ऋत्विज परब याने धडाका राखताना सर्व सातही डाव जिंकून अग्रस्थान पटकावले.

पणजीतील गोमंतक मराठा समाजाच्या राजाराम स्मृती सभागृहात स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेच्या सातव्या फेरीनंतर देवेश नाईक साडेसहा गुण नोंदवून दुसऱ्या स्थानी आहे.

Blitz Chess Tournament
IFFI Opening Ceremony: 'गोव्याला फिल्म हब बनविण्यासाठी प्रयत्न', कलाकारांच्या उपस्थितीत इफ्फीचे दिमाखात उद्घाटन

इंटरनॅशनल मास्टर नीतिश बेलुरकर, नीरज सारिपल्ली, ओ. टी. अनिलकुमार, आयुष शिरोडकर, आर्यन रायकर, किर्पेश यांचे प्रत्येकी सहा गुण असून ते संयुक्त तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर यांनी स्पर्धेचे उदघाटन केले. यावेळी संघटनेचे सचिव आशेष केणी, अरविंद म्हामल, दत्ताराम पिंगे, आतिश आंगले, नरेश पेडणेकर, पल्लवी काकोडकर यांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Under 19 Cricket Team
Durand Cup Football Tournament 2026
Goa Under 19 Cricket Team
 Ethan Vaz Grandmaster
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com