कोविड तपासणी (Goa) Dainik Gomantak
गोवा

Goa: कोविड तपासणी चुकवण्याचा प्रयत्न कारणाऱ्या खाजगी बसच्या ३ कर्मचाऱ्यांना अटक

पत्रादेवी चेकपोस्ट येथील घटना

Dainik Gomantak

Goa: सध्या कोरोनाचा काळ (Covide Epidemic) असल्याने आणि पेडणे तालुक्यातील एकमेव पत्रादेवी चेकनाक्यावर (Patradevi Check-Post) सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी सुरु आहे, ही तपासणी चुकवून पळून जावे या उद्देशाने काही खाजगी बसेस या नाक्यावर तपासणीसाठी न थांबता वेगाने हाकल्या जातात. या नाक्यावर खाजगी बसेस (Private Bus) कोरोना तपासणीसाठी थांबत नसल्याच्या कारणामुळे पेडणे पोलिसांनी तिघाना अटक (3 bus employees arrested) केली आहे. पत्रादेवी चेकपोस्टवर कोरोना तपासणीसाठी बस थांबत नसल्याबद्दल 03 खासगी बस कर्मचाऱ्यांविरोधात कलम 269, 188, 279 भादंविच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.व त्याना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी माहिती दिली की, आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास एक खाजगी बस (MH-47-AS-3464) पत्रादेवी चेकपोस्टवरून उतावीळपणे आणि निष्काळजीपणे धावली. मात्र सतर्क पोलिस (Goa Police) कर्मचाऱ्यांनी बसचा पाठलाग करून बस पुन्हा चेकपोस्टवर आणली.

तपासणी केल्यावर सर्व प्रवाशांकडे एकतर कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र हवे होते किंवा दोन्ही डोसमध्ये लसीकरण केले गेले आवश्यक होते. मात्र बस तपासणीसाठी थांबली नसल्याने सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले. त्यामुळे कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर सत्यवान हरजी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला, आणि बस स्टाफमध्ये 02 ड्रायव्हर्स होते ज्यात समीर आंबेकर एन/ओ रत्नागिरी, महाराष्ट्र आणि सगुन नाईक, एन/ओ आरोंदा , महाराष्ट्र कंडक्टरसह . श्री सिद्धार्थ शिंदे एन/ओ बोरीवली, मुंबईला अटक करण्यात आली. पेडणे पोलिसांनी खासगी बसही ताब्यात घेतली होती. सर्व प्रवाशाना नियोजित स्थळी पोचवण्यासाठी पेडणे पोलिसांनी वाहनाची सोय करून त्यांची स्वतंत्र व्यवस्था केली. पीआय दळवी यांनी माहिती दिली की, तैनात दंडाधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी नेहमी चेक पोस्टवर सतर्क असतात आणि ही घटना त्यांच्या सतर्कतेचे उत्तम उदाहरण आहे. तिघाही संशयिताना अटक केली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT