vishwajit rane Dainik Gomantak
गोवा

सर्व ओपीडी अपॉईंटमेंट ऑनलाईन करणार! गोमेकॉतील त्रुटीही शोधणार; आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणेंची माहिती

GMC online OPD appointment: येत्या काळात सर्व विभागाच्या अपॉईंटमेंट ऑनलाईन करण्यात येतील, असे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ‘गोमेकॉ’तील पाच विभागाच्या अपॉईंटमेंट ऑनलाईन करण्यात आले आहे. त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभत असून येत्या काळात सर्व विभागाच्या अपॉईंटमेंट ऑनलाईन करण्यात येतील, असे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले. गोमेकॉत एका कार्यक्रमानिमित्त आले असता ते माध्यमांशी बोलत होते.

आरोग्यमंत्री राणे म्हणाले, राज्यातील जनतेच्या दारापर्यंत सेवा पुरविण्यासाठी प्रयत्नशील आहे. आमच्या राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल आहेत, तरीही सुविधा पुरविण्यात त्रुटी जाणवतात. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात एमआरआय, सीटी स्कॅन आदी बाबतच्या समस्या आहेत, काही हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पुढे पाठविण्यात येते.

आपत्कालीन सुविधा, रूग्णवाहिका तसेच इतर त्रुटी नेमक्या काय आहेत याबाबत भारत सरकारचे अधिकारी आणि आरोग्य विभाग मिळून येत्या महिन्याभरात अहवाल सादर करतील, असेही त्यांनी सांगितले.

अहवाल आल्यानंतर सुविधा पुरवू

गोमेकॉसोबतच जिल्हा इस्पितळ, कुडचडे, काणकोण, चिखली, काणकोण आदी भागातील आरोग्य केंद्रांमध्ये जाणवणाऱ्या त्रुटींचा अहवाल तज्ज्ञांकडून येईल. अहवाल आल्यानंतर पुढील वर्षभरात कार्यवाही करत जनतेला सर्वोत्तम सुविधा पुरविण्यात येतील आणि ही काळाची गरज असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.

मोफत कर्करोग उपचार देणारे गोवा एकमेव

काही दिवसांपूर्वी १० लाखापर्यंत एका राज्याने आरोग्य सुविधा मोफत केल्याचे सांगण्यात आले, पंरतु गोवा हे एकमेव राज्य आहे जे कर्करोगाचे उपचार मोफत देते. या उपचाराचे किमो आणि इतर काढल्यास कित्येक पटीने अधिक आहे. केवळ आश्‍वासने देऊन काही होणार नाही, तज्ञांच्या सल्ल्याने गोव्याच्या जनतेला उत्तम आरोग्यसेवा पुरविण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आम्ही सर्वजण प्रयत्नरत असल्याचे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT