Goa Assembly Session: 'विधानसभा अधिवेशन कालावधी वाढवा'! विरोधकांची मागणी; सभापतींना पत्र देण्याचा घेतला निर्णय

Goa Budget Session: दरम्यान, तत्पूर्वी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ गटाच्या बैठकीत चिंबल ग्रामस्थांनी ४४ दिवस आंदोलन करून यश मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
Opposition MLAs Letter to Speaker and Governor
Opposition MLAs Letter to Speaker and GovernorDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आठव्या विधानसभेच्या १३व्या अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवण्यात आल्याबद्दल विरोधी आमदारांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, अधिवेशनाच्या बैठका वाढवाव्यात यासाठी विधानसभा सभापती आणि राज्यपालांना पत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. पर्वरी येथील विधानसभा संकुलात झालेल्या बैठकीत विरोधी पक्षांच्या आमदारांनी हा निर्णय घेतला.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा व एल्टन डिकोस्ता, रिव्हूल्येशनरी गोवन्स पक्षाचे आमदार वीरेश बोरकर तसेच आम आदमी पक्षाचे आमदार वेन्झी व्हिएगश व क्रूझ सिल्वा बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान, तत्पूर्वी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ गटाच्या बैठकीत चिंबल ग्रामस्थांनी ४४ दिवस आंदोलन करून यश मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. या आंदोलनामुळे ओलसर क्षेत्रातील युनिटी मॉल प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी हलविण्यास सरकारला भाग पाडावे लागले, याकडे बैठकीत लक्ष वेधले.

मंगळवारी झालेल्या सीएलपीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लोस फेरेरा आणि आमदार एल्टन डिकोस्ता सहभागी झाले होते. या बैठकीत आगामी विधानसभा अधिवेशनासह विविध राज्यस्तरीय प्रश्नांवर चर्चा झाली.

Opposition MLAs Letter to Speaker and Governor
Goa Politics: खरी कुजबुज; दामूंचे शक्‍तिप्रदर्शन?

‘आवाज तुमचा, सोबत आमची’ या उपक्रमांतर्गत कॉंग्रेसचे आमदार थेट लोकांशी संवाद साधणार असल्याचे आलेमाव यांनी सांगितले. ‘गाव, शहर आणि राज्यासमोरील ज्वलंत प्रश्नांबाबत नागरिकांच्या सूचना आम्ही ऐकून घेणार असून, त्या विधानसभा अधिवेशनात मांडणार आहोत, असे ते म्हणाले.

Opposition MLAs Letter to Speaker and Governor
Goa Politics: खरी कुजबुज; मुख्‍यमंत्र्यांचा स्‍ट्रायकर

आमदार कार्लुस फेरेरा यांनी काँग्रेस पक्षाने नेहमीच जनतेच्या बाजूने भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले.‘राज्याच्या हिताशी संबंधित इतर मुद्द्यांवरही चर्चा झाली असून, ते सर्व प्रश्न आम्ही एकत्रितपणे अधिवेशनात उपस्थित करू,’ असे त्यांनी सांगितले. याचबरोबर, फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणूक आणि तेथील काँग्रेस समर्थकांशी भेटीगाठी घेण्याबाबतही कॉंग्रेस आमदारांत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com