Goa Medical College Dainik Gomantak
गोवा

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Physiotherapy Department GMC: गोवा वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच ऑन्कोलॉजी आणि सायकियाट्रिक मेडिसिनमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील सुरू केला जाण्याची शक्यता

Akshata Chhatre

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या काही काळात मोठे बदल घडून येणार आहेत. आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सोमवारी (दि. 18 नोव्हेंबर) रोजी आरोग्य सेवा शिक्षणात होणाऱ्या लक्षणीय वाढीबद्दल माहिती दिली. राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील फिजिओथेरपीच्या जागांमध्ये 100 टक्यांची वाढ होणार असून आता नवीन जागांची भरती दुप्पट करण्यात आल्याची माहिती जाहीर केली आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच ऑन्कोलॉजी आणि सायकियाट्रिक मेडिसिनमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील सुरू केला जाण्याची शक्यता आहे. याबद्दलचा अर्ज गोवा विद्यापीठात दाखल करण्यात आला असून अद्याप विद्यापीठाचा निर्णय प्रलंबित आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सध्या 16 MD स्पेशलायझेशन, तीन मास्टर ऑफ सर्जरी कोर्स आणि आठ पीजी डिप्लोमा कोर्सेससह 29 पदव्युत्तर कोर्सेस शिकवले जातात, तसेच इथे आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी विविध शैक्षणिक संधी देखील उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

गोवा विद्यापीठाचे शाखा प्रमुख किंवा डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी गोव्यात आरोग्यसेवा शिक्षणाचा विस्तार होणं महत्वाचं असल्याचं प्रतिपादन केलं.

सध्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने घेतलेल्या या निर्णयांमुळे राज्यातील आरोग्यशिक्षण सेवा बळकट होण्यासाठी मदत मिळेल असं आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचं मत आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीचा प्रवेश NEET UG आणि NEET PG गुणांद्वारे ठरतो. सध्या नवीन प्रवेश मिळवण्यासाठीचे फॉर्म्स DHEच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित अर्ज भरून प्रवेश मिळवावा अशी माहिती स्पष्ट करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tisk-Usgao Accident: मध्यरात्री उसगावात दुचाकी आणि कंटेनरचा भीषण अपघात; मागे बसलेला युवक जखमी

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Chitrasangam 2024: प्रतिभावंतांचा कलाबहर! 'चित्रसंगम'मध्ये 17 चित्रकारांच्या कलाकृती

12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

कलारंगाची उधळण करणारा Colors of Resilience! दिव्यांगांसाठी नवीन अध्यायाची सुरुवात..

SCROLL FOR NEXT