GMC Goa: 'गोमेकॉ'त १६० सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण! तुकडीनुसार 'पुन्हा' आयोजन

Goa Medical College Hospital: गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन आगशी पोलिसांना प्रशिक्षण देण्याचे कळविण्यात आले होते. यासंदर्भात उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांसोबत बैठक देखील झाली होती.

Goa GMC Security GuardsCanva
Published on
Updated on

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन आगशी पोलिसांना प्रशिक्षण देण्याचे कळविण्यात आले होते. यासंदर्भात उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांसोबत बैठक देखील झाली होती.

त्यानुसार २७ सप्टेंबर रोजी १६० सुरक्षा रक्षकांना पोलिस उपनिरीक्षकांनी प्रशिक्षण दिल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांनी दिली. ताळगाव येथील गोवा विद्यापीठाच्या मैदानावर त्यांना प्रशिक्षणदेण्यात आले.

Goa Medical College Hospital:  गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन आगशी पोलिसांना प्रशिक्षण देण्याचे कळविण्यात आले होते. यासंदर्भात उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांसोबत बैठक देखील झाली होती.
GMC Goa: ‘गोमेकॉ’ समोरील रस्ते ‘व्हेंटिलेटर’वर! साबांखा’चे दुर्लक्ष; रुग्ण, गर्भवती आणि वृद्धांना नाहक त्रास

डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले, की गोवा वैद्यकीय महाविद्यालयात एकूण ५१५ सुरक्षा रक्षक आहेत. त्या सर्वांना तुकडीनुसार प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये केवळ शारीरिक प्रशिक्षण नसून मानसिक प्रशिक्षण देखील देण्यात येईल. जेणेकरून व्यक्तीचा अंदाज आधीच सुरक्षा रक्षकांना येईल आणि दुर्घटना घडण्यापूर्वीच ते ती थांबवू शकतात. महिलांशी कसे वागावे हे देखील त्यांना शिकविण्यात येईल. केवळ एकदाच त्यांना प्रशिक्षण देऊन होणार नाही. त्यामुळे पुन्हा त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Professional League final match result 2026
Cole Allen Trump Shooting Manifesto
Shirgao Lairai Jatra
Colvale Jail Ganja Smuggling
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com