Amit Patkar Goa Dainik Gomantak
गोवा

GMC Doctor Suspended: 'माज, अधिकारांचा गैरवापर गोव्याला भेडसावणारा खरा आजार', गोमेकॉत डॉक्टर, विद्यार्थ्यांचे आंदोलन

Goa medical protest news: गोवा मेडिकल कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्यांकडून निदर्शने सुरु झाली असून गोवा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी त्यांना पाठिंबा देत एक्सवर ट्विट केले

Akshata Chhatre

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) रुग्णालयातील डॉक्टर रुद्रेश कुट्टीकर यांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्यात आले आहे. गोमेकॉतील निवासी डॉक्टर, विद्यार्थी, विभाग प्रमुख आणि आयएमए गोवा शाखेचे पदाधिकाऱ्यांनी डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या कार्यालयासमोर सोमवारी (०९ जून) सकाळपासून निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे.

कॅज्युल्टी विभागाला आरोग्यमंत्र्यांनी शनिवारी (दि.७) रोजी अचानक भेट दिली आणि दरम्यान त्यांना विभागात एका वयस्क रुग्णाची हेळसांड झाल्याची माहिती मिळाली. समोर आलेल्या माहितीनुसार आरोग्यमंत्र्यांनी कॅज्युल्टी विभागातील डॉ. रुद्रेश यांना निलंबित करण्याचे आदेश दिल्यानंतर अनेकांनी या निर्णयाला विरोध केला.

या प्रकरणात आता गोवा मेडिकल कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्यांकडून निदर्शने सुरु झाली असून गोवा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी देखील त्यांना पाठिंबा देत एक्सवर ट्विट केले आहे.

गोव्यामध्ये डॉक्टरांवरील वाढत्या दबावामुळे आणि आरोग्यमंत्र्यांच्या गैरवर्तनामुळे आरोग्यसेवेत मोठा तणाव निर्माण झाला असल्याच्या चर्चा सुरु आहेत. "जेव्हा जीव वाचवणाऱ्यांना त्यांचे स्टेथोस्कोप बाजूला ठेवून रस्त्यावर उतरण्यास भाग पाडलं जातं, तेव्हा तो केवळ संप नसतो - तर तो सन्मान, न्याय आणि सुरक्षिततेसाठी केलेला आक्रोश असतो," असे म्हणत गोव्यातील डॉक्टरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची घोषणा गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

बडतर्फ करा अन्यथा सामूहिक बंडाला सामोरे जा

गोव्याला भेडसावणारा खरा आजार हा भाजपचा 'माज' आहे, अशी थेट टीका त्यांच्याकडून करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यावर 'अधिकारांचा गैरवापर' केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, त्यांच्या कारवाईने सर्व मर्यादा ओलांडल्याचं अमित पाटकर म्हणाले आहेत.

अमित पाटकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. "विश्वजित राणे यांना आताच बडतर्फ करा अन्यथा सामूहिक बंडाला सामोरे जा," असा थेट इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. रविवारी (दि.८) रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डॉ. रुद्रेश यांना निलंबित केलं जाणार नाही असं म्हणत गोवेकरांना आश्वस्त केलं होतं तर दुसऱ्या बाजूला कारवाई आवश्यक होती मात्र शब्द चुकल्याचं आरोग्यमंत्री राणे म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT