Goa Health Officers Suspended: भ्रष्टाचार, ब्लॅकमेलिंग भोवले! आरोग्यमंत्र्यांचा सहा कर्मचाऱ्यांना दणका; निलंबनाची प्रक्रिया सुरू

Health Department Investigation: गोव्यातील आरोग्य खात्यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस आल्याने, विभागातील 6 जणांवर निलंबनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.
Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील आरोग्य खात्यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस आल्याने, विभागातील 6 जणांवर निलंबनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे. यामध्ये 2 आरोग्य निरीक्षक आणि 4 स्वच्छता निरीक्षकांचा समावेश असून, भ्रष्टाचार तसेच नागरिकांना ब्लॅकमेल करण्याच्या प्रकारांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

विश्वजीत राणे यांनी दिलेल्या माहितीनूसार, या अधिकाऱ्यांची नावे येत्या आठवड्यात जाहीर केली जातील. आरोग्य विभागातील 6 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे, अन्न सुरक्षा निरीक्षक विश्वासराव राणे यांच्याविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यांच्यावर आधीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यावर सविस्तर चौकशी सुरू असून अहवाल पूर्ण झाल्यानंतर तो सार्वजनिक केला जाईल, असं विश्वजीत राणेंनी स्पष्ट केलं.

Vishwajit Rane
Goa Rain: गोवा, कोकणपट्टा ‘अलर्ट मोड’वर! 50 ते 70 किमी वेगाने वारे वाहणार; पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जारी

भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील. शासन कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार नाही, असेही राणे यांनी सांगितलंय.

आरोग्य खात्यात सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे इतर कर्मचार्‍यांमध्येही खळबळ उडाली आहे. सरकारकडून खात्यातील कार्यपद्धती पारदर्शक करण्यासाठी पुढील काही दिवसांत आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com