GMC doctor controversy Dainik Gomantak
गोवा

GMC Doctor Suspension: 'डॉ. रुद्रेश' प्रकरणाला पूर्णविराम! निलंबन मागे; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Dr Rudresh suspension revoked: राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवेकरांना आश्वासन दिलं आहे

Akshata Chhatre

पणजी: राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शनिवारी (दि. ७) अचानक धाड टाकत तिथल्या कामाची तपासणी केली. यादरम्यान त्यांनी कॅज्युल्टी विभागातील डॉ. रुद्रेश यांना त्यांच्या उद्धट वर्णाताणामुळे आरोग्यमंत्र्यांकडून तात्काळ निलंबित करण्यात आलं होतं. यानंतर अनेकांनी आरोग्यमंत्र्यांवर रोष व्यक्त केला आणि आता शेवटी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात प्रमुख भूमिका घेतली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवेकरांना आश्वासन दिलं आहे. "मी गोवेकरांना आश्वस्त करतो की जीएमसीचे डॉ.रुद्रेश कुट्टीकरांचे निलंबन होणार नाही. मी याबाबत आरोग्य मंत्री विश्वजीत राणेंशी चर्चा केली आहे". असं म्हणत त्यांनी राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा प्रत्येक नागरिकाच्या आरोग्य सेवेसाठी तत्पर असल्याचे म्हणत आरोग्य सेवेतील डॉक्टरांची प्रशंसा केली.

CMO Goa

"मी जे केले ते एका असाहाय्‍य, वृद्ध महिलेसाठी केले"

ट्विट करताना आरोग्यमंत्री म्हणालेत की, "मी जे केले ते एका असाहाय्‍य, वृद्ध महिलेसाठी केले आणि मी कायम अशीच मदत करत राहीन. मी प्रत्येक रुग्णाच्या हक्कासाठी आवाज उठवणार, कृती करणार आणि लढा देणार, असे आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर म्हटले आहे.

आरोग्यमंत्री म्हणून मी हस्तक्षेप केला आणि मी हे मान्य करतो की माझा सूर, भाषा अधिक सौम्य असायला हवी होती. मी ही जबाबदारी स्वीकारतो आणि खात्री देतो की, असा प्रकार पुन्‍हा होणार नाही.

परंतु, एका ज्येष्ठ नागरिकास आरोग्यसेवा नाकारण्यात आली, त्याच्या संरक्षणासाठी मी उभा राहिलो. त्‍यामुळे या प्रकाराबद्दल मी माफी मागणार नाही." असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

Mhadei River: ‘पिण्यासाठी पाणी’ हे कर्नाटकचे नाटक! ‘म्हादई’ तिन्ही राज्यांसाठी महत्त्वाची; कॅप्टन धोंड यांचे प्रतिपादन

School Bag Weight: ..विद्यार्थ्यांचा खांद्यावर दप्तराचे 'वाढते' ओझे! केंद्राच्‍या निर्णयाकडे गोव्याची पाठ; परिपत्रकाला ‘केराची टोपली’

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

SCROLL FOR NEXT