Dainik Gomantak
गोवा

Global Konkani Forum Protest: साहित्य अकादमींच्या कार्यक्रमांवर बहिष्कार; गोव्यातल्या कोकणी फोरमने टोकाचा निर्णय का घेतला?

Global Konkani Forum and Mand Shobhan Mangaluru: साहित्य अकादमीच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्लोबल कोकणी फोरम आणि मांड शोभन मंगळुरुकडून घेण्यात आलाय.

Manish Jadhav

साहित्य अकादमीच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्लोबल कोकणी फोरम आणि मांड शोभन मंगळुरुकडून घेण्यात आलाय. रोमी आणि कन्नडसह इतर लिपीचा साहित्य अकादमींकडून आदर केला जात नाही.

तसेच, अकादमी देवनागरी कोकणी प्रमाणे समान दर्जा देत नाही. तोपर्यंत कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे या संस्थांकडून सांगण्यात आले. मडगाव येथील रवींद्र भवनाच्या बाहेर 26 तारखेला मूक अंदोलन करण्यात येणार, अशी माहिती ग्लोबल कोकणीचे अध्यक्ष केनेडी अफान्सो यांनी दिली.

मूक आंदोलन

दरम्यान, ग्लोबल कोकणी फोरमकडून प्रसिद्धीपत्रक काढून मडगावातील रवींद्र भवनाच्या बाहेर निदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला. केनेडी अफान्सो यांनी सांगितले की, ग्लोबल कोकणी फोरम आणि मांड शोभन मंगळुरु संस्थांकडून कोकणी भाषा रसिकांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करते. मात्र साहित्य अकादमी रोमी आणि कन्नड लिपीचा आदर करत नाही. त्यामुळे आम्ही मडगाव येथील रवींद्र भवन येथे साहित्य अकादमीच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय.

देवनागरी लिपीला मान्यता!

साहित्य अकादमीने कोकणी भाषेसाठी केवळ देवनागरी लिपीलाच मान्यता दिलीय. मात्र कोकणीच्या इतर चार लिपींकडे दुर्लक्ष केले. एक भाषा व अनेक लिपी हे कोकणातील समृध्द भाषिक आणि सांस्कृतिक विविधता दर्शवतात. प्रत्येक लिपीचा इतिहास असून त्यांनी कोकणी साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

Goa Land Zoning: गोव्यातील सेर्नाभाटी, कोलव्यातील 12.74 लाख चौ. मीटर जमीन 'अविकासयोग्य'; सरकारची मंजुरी

Crime News: भरदिवसा सुरीने हल्ला; सूरज कसबेचा जामीन अर्ज फेटाळला, न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

SCROLL FOR NEXT