BJP Dainik Gomantak
गोवा

Goa Election: 'आयात नव्हे निष्ठावंताना तिकिट द्या'

असा टोला संदीप खांडेपारकर यांनी भाजपला लगावला.

दैनिक गोमन्तक

फोंडा: आगामी गोवा विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी विविध राजकीय पक्षातील अनेक नेते उत्सुक आहेत. यातच पक्षांतरामुळे प्रत्येक मतदारसंघात तिकिटाचे दावेदार वाढत आहेत. उमेदवारी नेमकी कुणाला जाहीर करायची? हा सर्व राजकीय पक्षांच्या पुढे मोठा प्रश्न आहे. उमेदवारी नाकारली की नेते लगेच बंड करण्यासाठी सरसावतात. भाजपला (BJP) देखील बंडखोरांमुळे मोठा फटका बसत आहे. (BJP Goa Assembly Election)

गोविंद गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे प्रियोळ मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी आणि मुख्य कार्यकर्त्यांनी सामूहीक राजीनामा दिला. गोविंद गावडेंच्या पक्ष प्रवेशामुळे हा गट नाराज असल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक संदीप निगळ्ये यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. गोविंद गावडेंच्या पक्ष प्रवेश व उमेदवारीबाबत प्रियोळ भाजपकडून निषेध व्यक्त करत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बंडखोरीची पुनरावृत्ती आता फोंड्यात होताना दिसत आहे. रवी नाईक यांनी मागच्या वर्षी कॉंग्रेसला (Congress) सोडून भाजपचा हात धरला. फोंड्यातून (Phonda) त्यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची जास्त शक्यता आहे. परिणामी भाजपचे संदीप खांडेपारकर यांनी बंड पुकारला आहे. भाजपकडून फोंड्याची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. फोंडा मतदारसंघ आदर्श बनवण्याची त्यांनी ग्वाही दिली आहे. आयात नव्हे निष्ठावंताना तिकिट द्या, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain 2025: गोव्यात परतीच्या पावसाचा शेतीला मोठा तडाखा! 4 हजारहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान; डिचोलीला सर्वाधिक आर्थिक फटका

Donald Trump: 'नोबेल मिळाला नाही, आता मी शांततेचा विचार करणार नाही'; ट्रम्प यांचं नॉर्वेला खळबळजनक पत्र, ग्रीनलँडवर ठोकला दावा!

Bicholim Mining Protest: पैरातील लोकांचा खाणीविरोधात पुन्हा एल्गार! साळगावकर खाणीचे कामकाज पाडले बंद; प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक

Pakistani Actress Video: "भारतीय पुरुष पाकिस्तानी मुलींसाठी वेडे...", पाक अभिनेत्रीच्या दाव्याने सोशल मीडियावर वाद, व्हिडिओ VIRAL

Viral Post: "आता तरी गंभीर व्हा!" विजयाचा पत्ता नाही अन् पराभवांचे रेकॉर्ड्स; नेटकऱ्यांनी गौतम गंभीरला धरलं धारेवर

SCROLL FOR NEXT