मडगाव: मागील आठ दिवसांत नऊ जीवघेण्या अपघातांची नोंद झाल्याने दक्षिण गोव्यातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे गोव्यातील रस्त्यांच्या स्थितीबाबत लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. (Accidents in Goa News)
सतत होणाऱ्या अपघातांबद्दल (Accident) पोलिस महासंचालक आय डी शुक्ला यांनीही चिंता व्यक्त केली आहे. याचबरोबर नागरिकांनी प्रवाशांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस हवालदार शैलेश गावकर आणि भारतीय राखीव बटालियनचे विश्वास देयकर यांचा सुरावली येथे गस्त घालत असताना अपघातात मृत्यू झाला. केनेडी डी'कोस्टा आणि त्यांची पत्नी नोएला डी'कोस्टा नावाच्या जोडप्याने देखील गांधी रोड येथे झालेल्या अपघातात जीव गमावला.
जवळपास सर्वच जीवघेणे अपघात हे बेफाम ड्रायव्हिंग आणि दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. बेशिस्त वाहनचालकांवर (Driver) कडक कारवाई होत नसल्याने अपघातांची संख्या वाढत आहे, असे लोकांचे म्हणणे आहे.
दारू पिऊन गाडी चलवणाऱ्या लोकांना पोलिसांनी (Police) तपासले पाहिजे. दारू पिऊन गाडी चालवल्याने अपघातांची पुनरावृत्ती होत आहे आणि ही पोलिसांची चूक आहे. पोलिसांनी वेळीच दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई केली असती तर अशा अपघातांची पुनरावृत्ती झाली नसती, असे माजी आमदार रेजिनाल्डो म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.