GMC | Goa Private Hospitals Dainik Gomantak
गोवा

ओबीसी विद्यार्थांना गोमेकॉत आरक्षण द्या : मधू नाईक

पुढील पंधरा दिवसात आरक्षण प्रक्रिया पूर्ण करावी

दैनिक गोमन्तक डिजिटल

भारतीय घटनेनुसार ओबीसी आणि एसी समाजाला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. परंतु आम्हांला अजून आपले हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

अजूनही गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळत नाही. सरकार आम्हांला आरक्षण देऊ इच्छित नसेल, तर तसे स्पष्ट सांगावे.

पुढील पंधरा दिवसात गोवा वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षणासाठी आरक्षण प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे गोवा प्रदेश अध्यक्ष मधू नाईक यांनी सांगितले. ते पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी एसटी समाजाचे नेते कृष्णा शिरोडकर, व सुनील नाईक उपस्थित होते. ओबीसी समाजाला तसेच एसटी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात आरक्षण मिळावे यासाठी ओबीसी नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

येत्या पंधरा दिवसात सरकारने जर यासंबंधात सकारात्मक पाऊले उचलली नाहीत, तर आम्हांला पुढील वाटचाल ठरवावी लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT