BJP Workers Dainik Gomantak
गोवा

पेडणे भाजपाची उमेदवारी स्थानिक उमेदवाराला द्या; भाजपा कार्यकर्त्यांची मागणी

भाजपाची (BJP) उमेदवारी यंदा स्थानिक उमेदवाराला द्यावी अशी मागणी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्त्यांनी 2 रोजी पेडणे शेतकरी सेवा सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परीशधेत केली.

दैनिक गोमन्तक

मोरजी: पेडणे मतदार संघातील (pernem constituency) भाजपाची (BJP) उमेदवारी यंदा स्थानिक उमेदवाराला द्यावी अशी मागणी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्त्यांनी 2 रोजी पेडणे शेतकरी सेवा सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परीशधेत केली. पेडणे मतदार संघातील जेष्ठ भाजपा कार्यकर्त्यांचा राग आजही उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यावर असल्याने आज जेष्ठ कार्यकर्त्यांनी उघडपणे बाबू आजगावकर (Babu Azgavkar) यांचाविरुद्ध एल्गार केला.

या पत्रकार परीशधेला माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, माजी भाजपा मंडळ अध्यक्ष कृशा गावडे, व्यंकटेश घोडगे, रोहिदास भाटलेकर, माजी सरपंच पंढरी आरोलकर, विश्वास नारोजी, जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, सुरेश केरकर, तुषार गडेकर, कल्पेश परब, दिगंबर अस्तेकर. पंच सत्यभामा पेडणेकर, पंच राकेश स्वार, राधिका गडेकर, शिवानी परब, साबाजी शेट्ये, महेश च्यारी, वासू हळर्णकर , अजित प्रभू, दशरथ गवंडी, राजन वीर, बाबनी गडेकर, श्रीधर देसाई, गिरीश कामत, गजानन देसाई, तुळसीदास कवठणकर, प्रीतम कलंगुटकर, प्रभाकर महाले, वसंत देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी जेष्ठ भाजपा कार्यकर्त्यांनी एकच नारा आणि एकच मागणी केली कि २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला पक्षाने स्थानिक उमेदवार द्यावा आम्ही त्याला आमदार करतो अशी ग्वाही दिली, आम्ही पक्षाच्या विरोधात नाही, मात्र यंदा स्थानिक उमेदवार द्यावा अशी सर्वांनी मागणी केली. स्थानिक उमेदवार दिला नाही तर आणि बाबुला उमेदवारी दिली तर तुमची भूमिका काय असणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता आमची एकच मागणी आहे आम्हाला स्थानिक उमेदवार द्या आणि पक्ष उमेदवारी यंदा स्थानिक नागरिकाला देईल असा विश्वास आहे. आणि आम्ही उमेदवारांची नावे सुचवणार त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी केली.

रमेश सावळ

माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ यांनी बोलताना 2012 च्या निवडणुकीत आम्हाला भूतपूर्व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व पक्षाने या नंतर स्थानिक उमेदवाराला तिकीट देणार अशे आश्वासन दिले होते मात्र 2017 च्या निवडणुकीत स्थानिक उमेदवार दिला नाही, निदान आतातरी स्थानिक उमेदवार द्यावा, त्याना आमदार बनवण्याचे आमचे काम आहे.

एकदिवस लक्षणीय उपोषण

स्थानिकाना उमेदवारी द्यावी यासाठी माजी मंडळ अध्यक्ष दाजी कासकर यांच्या नैतृत्वाखाली एक दिवसाचे लक्षणीय उपोषण केले होते. त्या उपोषणा नंतर पक्ष दखल घेवून उमेदवारी जाहीर करील अशी अपेक्षा होती, मात्र तसे काही घडले नसल्याने पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही पक्षाचे आमच्या मागणीकडे लक्ष वेधून घेण्याचे काम केल्याचे रमेश सावळ यांनी सांगितले. आता कार्यकर्त्यांनी या बैठकीतून मागणी करत आहोत, साडे तीन वर्षापासून जेष्ठ भाजपा कार्यकर्त्याना कुणी वालीच उरला नाही, व्यासपीठावर भाजपच्या कार्यक्रमात असून नावे घेतली जात नाही. या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवला त्याना जर मान सन्मान मिळत नसेल तर आमचा काय फायदा त्यासाठी पक्षाने कार्यकर्त्यांचा मान राखून स्थानिक उमेदवार द्यावा आणि तोच मान राखू शकतो असे रमेश म्हणाले.

व्यंकटेश घोडगे

भाजपाचे जेष्ठ कार्यकर्त्ये व्यंकटेश घोडगे यांनी बोलताना आम्ही पक्षाकडे २०१२ आणि २०१७ च्या निवडणुकीत स्थानिक उमेदवार द्यावा अशी मागणी केली पण दिला नाही. आता स्थानिक उमेदवाराच्या बाजूने मतदारांचा कौल असल्याने पक्षाने स्थानिक उमेदवार द्यावी अशी मागणी घोडगे यांनी केली. माजी पेडणे मंडळ अध्यक्ष कृष्णा गावडे यांनी बोलताना या निवडणुकीत केवळ स्थानिक उमेदवारालाच पक्षाने उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी केली. अनेक भाजपच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी या परीशधेत एकमुखी स्थानिक उमेदवार द्यावी अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT