Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: मालमत्तेच्या व्यवस्थापनाकरिता जीआयएस मॅपिंग

नगर विकास मंडळाच्या बैठकीत विविध निर्णयांवर शिक्कामोर्तब

गोमन्तक डिजिटल टीम

मालमत्तेच्या व्यवस्थापनाकरिता जीआयएस मॅपिंगबाबत निर्णय घेण्यात आला असून यासाठी मेसर्स कोलब्रो ग्रुपची मदत घेण्यात येईल, अशी माहिती नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे, नगर विकास मंडळाची बैठक आज पणजीत पार पडली यावेळी ते बोलत होते.

राणे म्हणाले, जीआयएस मॅपिंग मुळे कराची आकारणी, घनकचरा व्यवस्थापन यासह इतर अनेक बाबींनी स्पष्टता येणार आहे. यासाठीच मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी विविध प्रकल्पांवर चालू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.

प्रकल्प आणि खाजगी स्वरूपातील बांधकाम सुरू करण्यापूर्वी अत्यावश्यक बाबींची पूर्तता योग्य प्रकारे झाली आहे की नाही? याची काळजी घेऊनच प्रकल्पांना मंजुरी देण्यात येणार आहे. याशिवाय पर्यावरणीय संरक्षणासाठी विशेष काळजी घेण्यात येईल. प्रकल्प अधिक दर्जेदार आणि गतीने पूर्ण होण्यासाठी तांत्रिक व्यावसायिक गुणवत्तापूर्ण कर्मचाऱ्यांना सेवेसाठी घेण्यात येणार आहे.

‘दाबोळी’वर चर्चा : आज झालेल्या नगर विकास मंडळाच्या बैठकीत दाबोळी विमानतळाच्यावतीने उड्डाणक्षेत्राच्या परिसरात येणारी घरे आणि आस्थापनांना ती पाडण्याची नोटीस देण्यात आली आहे.

याबाबत गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने नगर नियोजन मंडळाच्या बैठकीत आक्षेप नोंदवण्यात आला. याबाबतचा निर्णय पुढील बैठकीत घेण्यात येणार आहे. प्रामुख्याने झुवारीनगर आणि संकवाळ परिसरातील घरे आणि आस्थापनाला दाबोळी विमानतळाच्या वतीने नोटीसा देण्यात आल्या आहेत.

मात्र मोपा विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर अनेक वर्षांच्या या इमारतींना आत्ताच नोटीस का देण्यात आल्या? अशी ही विचारणा झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT