Goa SSC Result Dainik Gomantak
गोवा

Goa Board SSC Result 2023: मुलीच हुश्शार! 10 वीत 96.64 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, जाणून घ्या सविस्तर निकाल

पेडणे तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थ्यी उत्तीर्ण

Ganeshprasad Gogate

Goa Board result 2023 गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (GBSHSE) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) परीक्षेचा म्हणजेच 10वीचा निकाल आज म्हणजेच 20 मे रोजी जाहीर केला आहे.

पर्वरी येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयातील परिषद सभागृहात हा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाचा दहावीचा निकाल 96.64 टक्के लागला आहे.

मागील वर्षी 92.7 टक्के निकाल लागला असून यंदा त्यांत सुधारणा होऊन हा निकाल 96.64 टक्के इतका लागला आहे. एकूण 19 हजार 958 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

पैकी 19 हजार 288 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 96.92 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून 96.37 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

पेडणे तालुक्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वाधिक म्हणजेच 98.84 इतकी आहे तालुक्यातील 1036 विद्यार्थ्यांपैकी 1024 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

तर मुरगाव तालुक्यात सर्वात कमी 95.16 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुरगाव तालुक्यातील 1737 विद्यार्थ्यांपैकी 1653 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

येथे पहा तुमचा निकाल-

हा निकाल मंडळाची अधिकृत वेबसाइट results.gbshsegoa.net तुम्ही भेट देऊन तुमचा निकाल तपासू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT