Phone Tapping Row
Phone Tapping Row Dainik Gomantak
गोवा

Phone Tapping Row: ही अघोषित आणीबाणी तर नव्हे ना?

दैनिक गोमन्तक

पणजी: परराष्ट्राच्या यंत्रणेची मदत घेऊन देशातील मान्यवरांचे फोन टॅप (Phone Tapping) करणे तथा हेरगिरी करणे, हे धक्कादायक आहे. गोवा प्रदेश समिती याचा निषेध करत असून या प्रकरणी स्वतंत्र न्यायालयीन समितीद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल मंगळवारी केली. पणजी येथील कॉंग्रेसच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप, प्रवक्ते तुलियो डिसोझा, सरचिटणीस आग्नेल फर्नांडिस उपस्थित होते. (Girish Chondankar said BJP government has dismantled national security)

देशाच्या गुप्त माहितीची इस्रायलच्या पॅगासस या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हेरगिरी करण्याचा प्रकार उघड झालेला असून ही अघोषित आणीबाणी तर नव्हे ना? असा प्रश्‍न यावेळी कामत यांनी यावेळी उपस्थित केला. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांच्या कार्यालयातील चार व्यक्तींसह अनेकांचे फोन टॅप करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. त्यामुळे अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी चोडणकर यांनी यावेळी केली. इतरांची गुप्त माहिती चोरणे, हा देशद्रोह असल्याचा दावा करून या घटनेचा प्रदेश कॉंग्रेसने निषेध केला.

...तर राजभवनवर मोर्चा

फोन टॅपिंग तथा हेरगिरी याच्या निषेधार्थ 22 किंवा 23 जुलै रोजी राजभवनावर मोर्चा नेला जाणार असल्याचे गिरीश चोडणकर यांनी सांगितले. या प्रकरणी पुढे आलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार दोषी ठरत असून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी ॲड. रमाकांत खलप यांनी यावेळी केली. तर एक प्रकारची हुकूमशाहीच असल्याची टीका आग्नेल फर्नांडिस यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Jatra: लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा; भाविकांचा लोटला महापूर

Netravali: कदंबच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार : वनमंत्री राणे

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT