Goa Election: ‘पैसा फेको, तमाशा देखो’

येत्या निवडणुकीत (Goa Election) निवडून येण्याचे स्वप्न पाहणारे सर्व प्रमुख उमेदवार समाजकार्यासाठी स्वत:चा खिसा रिकामा करताना आता अजिबात मागे-पुढे पाहात नाहीत.
Goa Election
Goa ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

येत्या विधानसभा निवडणुकीत (Goa Election) हळदोणेत (Aldona) भाजपचे (BJP) ग्लेन टिकलो, गोवा फॉरवर्डचे (Goa forword) किरण कांदोळकर आणि मगोचे महेश साटेलकर यांच्यात तिरंगी लढत होईल, हे तर जगजाहीरच आहे. त्यातच कांदोळकर हे तर टिकलोंच्या विरोधात दंड थोपटून पुढे सरसावले आहेत. दुसऱ्या बाजूने मगो पक्षाची ‘आप’शी युती होईल आणि युतीच्या जोरावर ही जागा मगोच्याच पदरात पडेल, या आशेने साटेलकर हेही पूर्ण तयारीनिशी कामाला लागले आहेत. येत्या निवडणुकीत निवडून येण्याचे स्वप्न पाहणारे सर्व प्रमुख उमेदवार समाजकार्यासाठी स्वत:चा खिसा रिकामा करताना आता अजिबात मागे-पुढे पाहात नाहीत. ‘काय वर्णावा त्यांचा दानशूरपणा’, या भावनेने येथील मतदारही सुखावलेले आहेत. हळदोणेत सध्या ‘पैसा फेको, तमाशा देखो’चेच राजकारण चाललेले आहे, असे प्रत्ययास येते. (Goa Election: Politics of money is currently going on in Aldona)

Goa Election
Goa Politics: मंत्रिमंडळ फेरबदलाबद्दल मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे विधान

हळदोणे विधानसभा मतदारसंघात यापुढे विद्यमान आमदार ग्लेन टिकलो यांच्याऐवजी थिवी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा हळदोणे मतदारसंघाचे भूमिपुत्र किरण कांदोळकर यांना भाजपाने उमेदवारी दिल्यास आम्ही प्राणपणाने त्यांच्या विजयासाठी कार्यरत राहणार आहोत, अशी ग्वाही नास्नोडा पंचायतीचे सदस्य सतीश गोवेकर यांनी दिली होती.

Goa Election
Goa Politics: "आधी माकड उड्या मारलेल्या आमदारांना तिकीट देऊ नका"

दरम्यान 'आप’ने राज्यात बऱ्यापैकी चळवळ उभी केली आहे. काँग्रेसचे आमदार फुटण्याला दोन वर्षे होत असताना या पक्षाने जी चित्रफीत तयार करून व्हायरल केली ती पाहता भाजपला ‘आप’ ताप देणार आहे. शिवाय फुटिरांचा आनेख्या पध्दतीने निषेध करताना आमदारांना केक देण्याचा प्रयत्न केला. आमदार विल्फ्रेड (बाबाशान) डिसा यांच्या घरी धडक दिली असता डिसा यांचे समर्थक आणि ‘आप’चे कार्यकर्ते यांच्यात राडा झाला. त्यानंतर निषेधमोर्चा, आव्हान-प्रतिआव्हान असा सामना सुरू झाला आहे. भाजपलाही या गोष्टी आता गांभीर्याने घ्याव्या, असे वाटू लागले आहे. ‘आप’ आपल्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही गोवा दौरा करून ‘आप’च्या कार्यकर्त्यांना धीर दिला आहे. दुसऱ्या बाजूने मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर आणि आमदार सुदिन ढवळीकर यांनी केजरीवालांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com