Girish Chodankar  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ‘त्या’ मंत्र्याची हकालपट्टी करा : गिरीश चोडणकर

सगळ्याच मंत्र्यांकडे अंगुलीनिर्देश: जमीन हडपप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दैनिक गोमन्तक

पणजी: जमिन हडप प्रकरणात गुंतलेल्या ‘त्या’ मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्याकडे रविवारी केली. सध्या तरी या मंत्र्यांचे नाव चोडणकर यांनी सांगितलेले नाही. त्यामुळे सगळ्याच मंत्र्यांकडे अंगुलीनिर्देश होत आहे.

(Girish Chodankar demands that minister involved in land grab case should be removed from cabinet)

चोडणकर म्हणाले, दीड महिन्यांपूर्वी या विषयाकडे समाज माध्यमावरून सरकारचे लक्ष वेधले होते आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात गुंतलेल्या मंत्र्याला तत्काळ काढून टाकावे अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना ‘त्या’ मंत्र्यांचा कथित जमीन बळकाव प्रकरणात हात असल्याचे माहिती असूनही त्याला मंत्रिमंडळातून काढून टाकले नाही वा जाहीरपणे कोणताही मंत्री या प्रकरणात गुंतलेला नाही असे हे स्पष्ट केलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात धारण केलेले मौन बरेच काही सांगून जात आहे. मुख्यमंत्र्यानी संबधित मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढले नाही तर या प्रकरणातील मंत्र्याचा सहभाग असलेली सर्व कागदपत्रे सार्वजनिक करू असा इशारा गिरीश चोडणकर यांनी दिला आहे.

10 दिवसांत कारवाई अपेक्षित

या प्रकरणी येत्या 10 दिवसांत मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून वगळावे किंवा जाहीरपणे कोणताही मंत्री जमिन हडप प्रकरणात गुंतला नाही असे सांगावे असे आव्हान चोडणकर यांनी दिले आहे. असे करताना त्यांनी यापूर्वी लैंगिक आगळीकीच्या आरोपावरून तत्कालीन मंत्र्याचा कसा राजीनामा घ्यावा लागला होता याची आठवण करून दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT