देशात काँग्रेस पुन्हा उर्जितावस्थेत येणार; सुशीलकुमार शिंदे

सुशीलकुमार शिंदे : खलप यांची सदिच्छा भेट
Sushil Kumar Shinde
Sushil Kumar ShindeDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: काँग्रेसला मरगळ येण्याची ही पहिली वेळ नसून तिसरी आहे. याआधी, सुद्धा काँंग्रेस पक्ष यातून बाहेर पडला आहे. तिसऱ्यांदा देखील हा पक्ष या स्थितीतून बाहेर पडेल आणि पुन्हा एकदा काँग्रेसला उर्जितावस्था प्राप्त होईल, असा आत्मविश्वास महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री तसेच ज्येष्ठ नेते सुशीलकुमार यांनी व्यक्त केला.

(Congress will come back to power in the country)

Sushil Kumar Shinde
Goa Accident : कुंकळ्ळीत मासळीवाहू ट्रक पुलावरुन खाली कोसळला

शिंदे यांनी रविवारी (ता.७) माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप यांच्या म्हापशातील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. सुशीलकुमार शिंदे हे आपल्या कुटूंबासोबत गोव्यात सध्या सुट्टीवर आले आहेत. यावेळी खलप यांनी शिंदे यांचे शाल, पुस्तक व पुष्पगुच्छ देत स्वागत केले. देशातील राजकारणावर भाष्य करताना शिंदे म्हणाले, आज संपूर्ण देशातील परिस्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे कुठे काय होईल, याचा नेम नाही. कारण, सानुकूल विचारांची नितीच सध्या संपलेली दिसते. त्यामुळे कधी काय घडेल, हे स्पष्टरित्या सांगता येणार नाही.

गोव्यात किनारी क्षेत्रांमध्ये उद्योग वाढले

उद्योग वाढ झालेली आहे. पन्नास वर्षांपासून मी गोव्यात येत आहे. गोवा मुक्तीनंतर पहिल्यांदाच मी गोव्यात आलो होतो. तसेच आता गोव्यात फार मोठे बदल व सुधारणा झाल्याची दिसते. येथील रस्ते, पुल, वाहतूक हा एकंदरीत विकास झालेला आहे. सरकारने हा विकास केला आहेत, मात्र त्यासोबतच सरकारला जनतेचे सहकार्य लाभले, असे शिंदे म्हणाले.

Sushil Kumar Shinde
Vishwajit Rane: गावच्या विकासात सर्वांनी एकत्र यावे

खलपांना शुभेच्छा!

मी माझ्या कुटूंबियांसोबत गोव्यात ‘हॉलिडे’साठी आलो होतो. तेव्हा वर्तमानपत्रातून समजले की, अ‍ॅड. रमाकांत खलप यांचा नुकताच ७५व्या वाढदिनानिमित्त समारंभ संपन्न झाला. मी फोन करुन खलप यांना कळविले की, मी गोव्यात असून तुमची भेट घेऊ इच्छितो, असे खलपांना म्हणालो.

गांधींवरील कारवाई ही आकसापोटी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांच्यामागे असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरासंदर्भात शिंदे यांनी टीका करीत सांगितले की, सदर चालू कारवाई ही आकसापोटी म्हणावी लागेल. कारण, हेराल्ड वर्तमानपत्र हा पंडित नेहरु यांच्या अगोदरच्या काळातील आहे. त्यामुळे आताच त्यासंदर्भात चौकशीचे कारण काय? हे सांगताच येत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com