Girish Chodankar appeal to make PAC report public within 72 hours  Dainik Gomantak
गोवा

72 तासांत ‘पीएसी’ अहवाल सार्वजनिक करा: गिरीश चोडणकर

काँग्रेसची मागणी: आरोप सिद्ध करण्यास भाजपला अपयश

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजपने खनिज व्यवसाया संदर्भातील तथाकथित ‘पीएसी’ अहवाल 72 तासांच्या आत सार्वजनिक करण्याचे धाडस करावे असे आव्हान गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले आहे. एका दशकापूर्वी या अहवालाचा वापर करून काँग्रेसने 35 हजार कोटींचा खाण घोटाळा केल्याचा आरोप भाजपने केला होता. मात्र, तद्‌नंतर भाजपने सरकार स्थापन करून या मुद्द्यावर बोलणेच बंद केले आणि हा आरोप सिद्ध करण्यासही त्यांना अपयश आल्याचा टोला चोडणकर यांनी हाणला. (Girish Chodankar appeal to make PAC report public within 72 hours sad98)

भाजप Goa BJP हा अहवाल सार्वजनिक करण्यात अपयशी ठरल्यास, हे सिद्ध होईल की निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी या मतदारांची दिशाभूल केली होती आणि त्यासाठी त्यांनी गोव्यातील जनतेची आणि कॉंग्रेस Goa Congress पक्षाची माफी मागितली पाहिजे. चोडणकर यांनी पणजीत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली. यावेळी राष्ट्रीय नेत्या व सोशल मिडिया प्रभारी अलका लांबा, अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आनंद सुर्वे, प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर वारखंडकर आदी उपस्थित होते.

खाण घोटाळ्यावरून काँग्रेसवर आरोप केल्यानंतर भाजपने दोनदा सत्ता काबीज केली. मात्र तपास करून पैसे वसूल करण्यात अपयश आले. या प्रकरणाची चौकशी करून पैसे का वसूल केले नाहीत हे आता स्पष्ट व्हायला हवे. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर भाजपवर केलेल्या प्रत्येक आरोपाची चौकशी करून कारवाई केली करील. मी केलेले आरोप काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यावर त्याची चौकशी करण्याची जबाबदारी माझी आहे, अन्यथा राजकीय फायदा घेण्यासाठी मी आरोप करत होतो, हे सिद्ध होईल, असे ते गिरीश चोडणकर Girish Chodankar म्हणाले.

केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार आहे, मग त्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यात कोणी रोखले, असा प्रश्न करून चोडणकर म्हणाले, राज्यात तीन वेगवेगळे प्रकल्प व कोळसा यासदर्भात केंद्रातील भाजप, आप आणि टीएमसीने आपली भूमिका स्पष्ट करावी असेही आव्हान त्यांनी केले आहे. गोव्यातील लोक मोफत काहीही मागत नाहीत, परंतु गोवा कोळसामुक्त होईल की नाही आणि तीन वादग्रस्त प्रकल्प रद्द होणार की नाही याची हमी त्यांना हवी आहे.

भाजपकडे 4847 रुपये!

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार, 2019-20 मध्ये भाजपकडे 4847 कोटी रुपये आहेत, जे 2013 - 14 मध्ये फक्त 780 कोटी होते. हा पैसा कुठून आला, हे भाजपने स्पष्ट करावे, से अल्का लांबा म्हणाल्या. आनंद सुर्वे म्हणाले की, बेरोजगारी, महागाई आणि तीन वादग्रस्त प्रकल्प यामुळे गोव्याचे नुकसान होत आहे. आम्हाला भाजपला घरी पाठवायचे आहे आणि म्हणून आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

SCROLL FOR NEXT