गोव्यातील निवडणूकीचे चित्र आज होणार स्पष्ट

अपक्ष अर्ज मागे घेण्याची शक्यता
Goa Election 2022
Goa Election 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अंतिम दिवस असून अनेक अपक्ष उमेदवार आपला अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. याशिवाय राजकीय पक्ष बंडखोरी टाळण्यासाठी आज सर्वतोपरीने प्रयत्न करणार असून काही ठिकाणी पक्षीय उमेदवारांचे अर्जही मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. (Possibility of withdrawal independent application for Goa elections)

Goa Election 2022
गोव्यात आजपासून 15-18 वयोगटातील मुलांना मिळणार लसीचा दुसरा डोस

बंडखोरीचा सर्वाधिक फटका भाजपला

बंडखोरीचा सर्वाधिक फटका सत्ताधारी भाजपला Goa BJP बसला असून अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली आहे. यामध्ये मांद्रे, पणजी, प्रियोळ, फोंडा, सावर्डे, काणकोण, कुंभारजुवे Cumbarjua या मतदारसंघांचा समावेश आहे. पक्षातर्फे ही बंडखोरी रोखण्यासाठी आज सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. बंडखोरी टाळण्यात पक्षाला अपयश आल्यास त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

40 जागा, 332 अर्ज

विधानसभेच्या 40 जागांसाठी 587 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननी झाल्यानंतर यापैकी 332 उमेदवारी अर्ज अद्यापही शिल्लक आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजप, काँग्रेस Congress, आम आदमी पक्ष, रिव्होल्युशनरी गोवन्स यांचे सर्वाधिक उमेदवारी अर्ज असून तृणमूल काँग्रेस Goa TMC, गोवा फॉरवर्ड, मगोप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड यांचेही उमेदवारी अर्ज आहेत. काही उमेदवारांनी डमी अर्जही भरले आहेत. आज यापैकी काही अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com