Giri Mapusa service road collapsed Dainik Gomantak
गोवा

Mapusa: गिरी म्हापसा सर्व्हिस रोडला भगदाड

नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली

गोमन्तक डिजिटल टीम

गिरी म्हापसा सर्व्हिस रोडला (Giri Mapusa service road collapsed) भल मोठ्ठं भगदाड पडले आहे. आज (दि.23) सकाळी काही वाहन चालकांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यानंतर त्यांनी इतर वाहन धारकांना सतर्क केले, त्यामुळे दुर्घटना टळल्या. पाण्याच्या प्रवाहामुळे हे रस्ता खचला असल्याचे अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, या भगदाडामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी रस्त्याला भगदाड पडल्याचे निदर्शनास आले. स्थानिकांनी इतर वाहन चालकांना याबाबत माहिती देऊन सतर्क केले. तसेच, पोलिसांना देखील याची माहिती दिली. घटना निदर्शनास आल्यामुळे चालकांना सतर्क करून अपघात टळले. रात्रीच्यावेळी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचे येथील स्थानिक म्हणाले.

Giri Mapusa service road collapsed

दरम्यान, गोवा हवामान विभागाने रविवारी राज्यात येलो अलर्ट जारी केला आहे. दोन्ही जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT