गोव्यात मागील साडेपाच वर्षांत 1,538 आत्महत्यांची (Suicide in Goa) नोंद झाली आहे. यामध्ये फोंडा परिसरात सर्वाधिक 191 प्रकरणांची नोंद झाली आहे. तर 16 जणांनी बेरोजगारीच्या कारणास्तव (Unemployment) आपली जीवनयात्रा संपवली आहे.
मागील पाच वर्षे 2017 पासून 30 जून 2022 पर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार फोंडा पोलिस (Ponda Police) स्थानकात 191, म्हापसा 117, डिचोली 103 मायणा-कुडतरी 96, आगशी 42, हणजुणे 32, कळंगुट 48, कोलवाळ 12, जुने गोवे 67 (Old Goa), पणजी 43 (Panjim), पेडणे 65, पर्वरी 63, साळगाव 12, वाळपई 52, काणकोण 42, कुळे 21, कोलवा 63, कुंकळ्ळी 66, कुडचडे 55, फातोर्डा 34, मडगाव 57, मुरगाव 6, केपे 51, सांगे 29, वास्को 63, वास्को रेल्वे पोलिस (vasco railway police) स्थानक 17, वेर्णा 78 आणि कोकण रेल्वे पोलिस (Konkan railway police) स्थानक 13 आत्महत्यांची नोंद झाली आहे.
आत्महत्या कराणांमध्ये बेरोजगारी (Unemployment) हे एक कारण असून बेरोजगारीमुळे 16 जणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. 2017, 2019 आणि 2020 मध्ये प्रत्येकी दोन, तर 2018 मध्ये तीन आणि 2021 मध्ये सहा जण व मागील सहा महिन्यांत एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.