Water Crisis Dainik Gomantak
गोवा

Girdoli: 10 दिवस पाणीपुरवठा ठप्प, विहिरीचे पाणी आटले; संतप्त ग्रामस्थांचा अभियंत्याला घेराव

Water Crisis Girdoli: लवकरात लवकर गावात पाणीपुरवठा करावा, अशी मागणी स्थानिकांनी यावेळी केली. येथील विहिरीतील पाणी देखील आटलेले आहे, असे त्यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: कोलीमोड्डी, गिरदोळी येथे गेले दहा दिवस पाणीपुरवठा ठप्प असल्याने स्थानिकांचे हाल झाले आहेत. गुरुवारी स्थानिकांनी बड्डे येथील पीडब्ल्यूडी कचेरीत येऊन सहाय्यक अभियंता दिपक देसाई यांना घेराव घालत धारेवर धरले.

लवकरात लवकर गावात पाणीपुरवठा करावा, अशी मागणी स्थानिकांनी यावेळी केली. येथील विहिरीतील पाणी देखील आटलेले आहे, असे त्यांनी सांगितले. गिरदोळीचे पंच फ्रॅंकी रॉड्रिग्स स्थानिकांसोबत होते. रॉड्रिग्स यांनी सांगितले की, आम्ही कित्येक वेळा कचेरीत येऊन गेलो;

पण प्रत्येक वेळी अभियंता गैरहजर असल्याचे दिसून आले. कचेरीतील कर्मचारीसुद्धा नेमके ते कुठे गेले, हे सांगू शकले नाहीत. नोव्हेंबरमध्ये पाऊस संपला आणि तेव्हापासून पाण्याची समस्या सुरू झाली. आता ते तिथे नवीन जलवाहिनी घालणार असल्याचे सांगतात.

नवीन जलवाहिनी घालणार

या संदर्भात सहाय्यक अभियंता दिपक देसाई यांनी सांगितले की, या भागात पाणीपुरवठा करणारी एसी जलवाहिनी ३० वर्षांपूर्वीची आहे. पाण्याचा दाब वाढला तर ती फुटते. सध्या जलवाहिनी फुटलेली आहे. आम्ही नवीन जलवाहिनी गिरदोळी-माकाझनकडून घालण्याच्या प्रयत्नात आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Alphonso Alert: हापूसवर युद्धाचं सावट! मध्यपूर्वेतील संघर्षाचा कोकणच्या आंब्याला फटका; निर्यातीचं गणित बिघडणार

सूर्य दोनापावला ठिकाणी जुवारीच्या मुखात लांब जात म्हणतो, ‘कदंब, बेतीवरे, पर्वरी, बांबोळी, वेर्णा आणि साकवाळ पठारे म्हातारी झाली’

Islamabad Airport Drone Attack: पाकच्या एअर स्ट्राईकला तालिबानचं चोख उत्तर! इस्लामाबाद विमानतळावर ड्रोन हल्ला; अनेक सैनिक ठार झाल्याचा दावा

निरा, हुर्राक, फेणी! 16 व्या शतकात, पोर्तुगीज काळात गोव्यात रोवलेल्या काजूच्या पहिल्या रोपाची झाडावेगळी अद्वितीय रूपे

Goa AI Policy: 'येत्या 100 दिवसांत आणणार ‘एआय’ धोरण'; रोहन खंवटेंनी दिली माहिती Watch Video

SCROLL FOR NEXT