Ghogal liquor shop fire Dainik Gomantak
गोवा

घोगळ येथे दारूच्या दुकानाला आग; अग्नीशमन दलाने मिळवले नियंत्रण, चार रेफ्रिजरेटर, दारूच्या बाटल्या तसेच इतर साहित्य जळून खाक

Ghogal liquor shop fire: घोगळ येथे एका घाऊक दारू दुकानाला रविवारी सकाळी भीषण आग लागून मोठे नुकसान झाले.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: घोगळ येथे एका घाऊक दारू दुकानाला रविवारी सकाळी भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज मडगाव अग्निशामक दलाने व्यक्त केला आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अधिकारी गील सोझा यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. रोडॉल्फो दोराय अपार्टमेंटच्या तळमजल्यावर असलेल्या ‘राइट लिकर’ या दुकानाला सकाळी सुमारे सव्वा दहाच्या सुमारास आग लागली.

हे दुकान केनेडी सोझा यांच्या मालकीचे असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या आगीत चार रेफ्रिजरेटर, दारूच्या बाटल्या तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. आगीची झळ शेजारील सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानालाही बसली असून त्या दुकानातील एसी जळाल्याची माहिती आहे. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या दोन बंबांचा वापर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

Goa Kala Academy : कला अकादमीला आता तरी जाग येणार का?

SCROLL FOR NEXT