घोडेमोडणी Dainik Gomantak
गोवा

गावकरवाडा-डिचोलीत ‘घोडेमोडणी’ जल्लोषात

दैनिक गोमन्तक

डिचोली: हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आणि ढोल-ताशांच्या ''घुमचे कटर घुम''च्या तालावर गावकरवाडा-डिचोली येथील प्रसिद्ध "घोडेमोडणी'' आज (सोमवारी) प्रचंड उत्साहात साजरी करण्यात आली. गावकरवाडा येथील ग्रामस्थ गावकर मंडळातर्फे साजरा करण्यात येणाऱ्या श्री शांतादुर्गा रवळनाथ देवस्थानच्या शिगमोत्सवात घोडेमोडणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.

सायंकाळी चार घोडेस्वार साजविल्यानंतर गावकरवाडा येथील श्री शांतादुर्गा देवस्थानकडून "घोडेमोडणी" सुरवात झाली. गाऱ्हाणे घातल्यानंतर ढोल-ताशांच्या ठेक्यावर घोडेस्वारांनी ताल धरला सुरवातीस आतीलपेठ येथे तीन आणि नंतर गावकरवाडा येथील श्री रवळनाथ मंदिर परिसरात पाच फेरे मारल्यानंतर पारंपरिक पद्धतीने घोडेमोडणीची सांगता झाली. घोडेमोडणीचा आस्वाद घेण्यासाठी गावकरवाडा ते कायरो हॉस्पिटलपर्यंत नागरिकांनी गर्दी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Devara Part 1: गोव्यातील वॉटर ॲक्शन सीन, गाणी आणि बरचं काही... NTR ने चित्रपटाबाबत केले अनेक खुलासे

Goa Chess Tournament: मानांकन स्पर्धेत गोव्याच्या खेळाडूंची विजयी सलामी; रशिया-इंग्लंडमधून खेळाडूंचा सहभाग

ISL 2024-25: एफसी गोवाचा घरच्या मैदानावर पराभव; आता लक्ष मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्धच्या लढतीवर

Medical Camp: पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या शिबिरांची शृंखला पणजीतून सुरु

Shram Dham Yojana: गोव्यात गरजूंसाठी 'एक हजार घरे' उभारणार; सभापती तवडकर यांची घोषणा

SCROLL FOR NEXT