Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: प्रत्‍येक तालुक्‍याच्या ठिकाणी पत्रकार कक्ष उघडा; विजय सरदेसाईंचे मुख्‍य सचिवांना पत्र

लोकांनाही आपली गार्‍हाणी कक्षात येऊन पत्रकारांसमोर मांडता येईल : सरदेसाईं

सुशांत कुंकळयेकर

Vijai Sardesai Demanding Press Rooms In Every Taluka: गोव्‍यातील ग्रामीण पत्रकारांना सोयीचे व्‍हावे यासाठी प्रत्‍येक तालुक्‍यात सरकारने पत्रकार कक्ष उघडून त्‍यात पत्रकारांना काम करण्‍यासाठी सोयी उपलब्‍ध करुन द्याव्‍यात अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी सरकारकडे केली आहे.

यासंबंधी शुक्रवारी त्‍यांनी मुख्‍य सचिवांना पत्र पाठविले आहे. ही मागणी आपण विधानसभेतही केली होती अशी माहिती सरदेसाई यांनी दिली.

ग्रामीण भागात सुसज्‍ज अशा पत्रकार कक्षाची सोय नसल्‍याने ग्रामीण पत्रकारांना बातम्‍या तयार करण्‍यासाठी त्रास सहन करावे लागतात. कुठलीही पत्रकार परिषद घेण्‍यासाठीही त्‍यांना जागा उपलब्‍ध असत नाही.

हे सर्व लक्षात घेऊन गोवा सरकारच्‍या माहिती खात्‍याने प्रत्‍येक तालुक्‍यात पत्रकार कक्ष उभारण्‍यासाठी तातडीने पाऊले उचलावीत.

या पत्रकार कक्षात पत्रकारांना बसण्‍यासाठी जागा, उच्‍च क्षमतेची इंटरनेट सेवा, प्रिन्‍टींगची यंत्रणा तसेच पत्रकार परिषद घेण्‍यासाठी जागा उपलब्‍ध करुन द्यावी अशी मागणी सरदेसाई यांनी या पत्रातून केली आहे.

अशा पत्रकार कक्षामुळे सरकारच्‍या वेगवेगळ्‍या खात्‍याची माहिती पत्रकारांना देण्‍यासाठी एक जागा उपलब्‍ध होईल तसेच सामान्‍य लोकांनाही आपली गार्‍हाणी या कक्षात येऊन पत्रकारांसमोर मांडता येईल.

असे सांगून कुठल्‍याही नागरिकाला या कक्षाचा बातमीच्‍या कामासाठी वापर करायचा असेल तर त्‍याला नाममात्र शुल्‍क देऊन ही सोय त्‍यांनाही उपलब्‍ध करुन द्यावी अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Goa: सभागृहावर पडले झाड, 2 वाहनांचे नुकसान; पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: गजपती राजू यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

Goa Film Festival: गोवा चित्रपट महोत्सव कोणासाठी? की फक्त औपचारिक सोहळ्यांचे आयोजन..

SCROLL FOR NEXT