GFA president Cayetan Fernandes Dainik Gomantak
गोवा

Housie Gambling: काय एक ते ठरवा! गोव्यातील ‘हाऊजी माफिया’वर दंडात्मक कारवाई करा, कायतान फर्नांडिसांनी बदलली भूमिका

GFA President Urges CM to Act on Housie Mafia: काही दिवसांपूर्वी गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी मडगावात दक्षिण गोव्यातील सर्व फुटबॉल क्लबची बैठक बोलावून त्यात हाऊजी बंदीवर चर्चा केली.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: काही दिवसांपूर्वी गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी मडगावात दक्षिण गोव्यातील सर्व फुटबॉल क्लबची बैठक बोलावून त्यात हाऊजी बंदीवर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी हाऊजीवरील बंदी उठवावी, अशी मागणी सरकारकडे केली होती. मात्र, मंगळवारी (ता.१५) पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, गोव्यात हाऊजी माफिया कार्यरत आहेत, हे खरे आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याची सखोल चौकशी करून दंडात्मक कारवाई करावी.

हाऊजी गोव्यात (Goa) गत ७० वर्षांपासून सुरू आहे. गोव्यातील फुटबॉल क्लब जीएफए तसेच सोसायटी कायद्याखाली नोंद झालेले आहेत. त्यांचे हिशोब तपासले जातात. हे सर्व क्लब गरीब आहे. त्यासाठी एखादी स्पर्धा आयोजित करून व हाऊजीद्वारे खर्चापुरते पैसे गोळा करणे एवढ्यापुरतीच ती मर्यादित होती.

दररोजच्या सामन्यासाठी ५० ते १०० रुपये शुल्क व जास्तीत जास्त २ ते ५ हजार रुपये बक्षिसाची रक्कम, अंतिम सामन्यात जर त्या स्पर्धेच्या पुरस्कर्त्याने देणगी दिली तर रक्कम जास्तीत जास्त ५० हजार ते एक लाख रुपये असायची. यापेक्षा जास्त हाऊजीत बक्षिसाची रक्कम गेलेली नाही, असेही कायतान फर्नांडिस यांनी सांगितले.

नावेलीतून सुरुवात

या दिवसांत १०, २०, २५, ५० लाख रुपयांपर्यंत बक्षिसांची रक्कम देण्यात येते. हे प्रकरण नक्की काय हे आम्हालाही माहिती नाही. या चार-पाच हाऊजी माफियांमुळे फुटबॉल क्लबची बदनामी होत आहे. ही सुरुवात नावेलीतून झाल्याचे कायतान फर्नांडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

SCROLL FOR NEXT