Gautam Khattar Dainik Gomantak
गोवा

जामिनावर सुटताच गौतम खट्टर पत्रकारांवरच घसरला! "गोव्यातील पत्रकारांनी नैतिकता शिकावी" म्हणत उधळली मुक्ताफळे; वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा सापडला वादात

Goa journalists vs Gautam Khattar: काहीच दिवसांपूर्वी सेंट फ्रान्सिस झेवियर य‍ांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये करून तुरुंगात गेलेल्या आणि जामिनावर मुक्त झालेला हिंदुत्ववादी गौतम खट्टर शनिवारी स्थानिक पत्रकारांवरच घसरला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: काहीच दिवसांपूर्वी सेंट फ्रान्सिस झेवियर य‍ांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये करून तुरुंगात गेलेल्या आणि जामिनावर मुक्त झालेला हिंदुत्ववादी गौतम खट्टर शनिवारी स्थानिक पत्रकारांवरच घसरला. त्यामुळे पत्रकारितेसह राजकीय क्षेत्रातूनही त्याच्यावर टीकेची झोड सुरू झाली आहे. जामिनावर मुक्तता झाल्यानंतर पणजीतील पत्रकारांनी प्रश्न विचारण्यासाठी खट्टरभोवती गराडा घातला.

त्यावेळी ‘गोव्यातील पत्रकार पत्रकारितेची शिस्त पाळत नाहीत, त्यांनी पत्रकारितेची नैतिकता शिकावी. मीही पत्रकारितेचा विद्यार्थी असून त्यात पदवी संपादन केली आहे’, अशी मुक्ताफळे त्याने उधळली. दरम्यान, खट्टरच्या या वक्तव्यांनंतर गोवा श्रमिक पत्रकार संघटनेसह (गुज) ज्येष्ठ पत्रकारांनी त्याचा निषेध नोंदवला, तर ‘बाहेरून गोव्यात येऊन जे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्य‍ांना अवाजवी प्रसिद्धी दिल्यास त्यांच्यात पत्रकारांनाही नितीमत्ता शिकवण्याचे धाडस येते’ असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणाले.

‘फूट न पाडता वार्तांकन करणे म्हणजे जबाबदार पत्रकारिता. गोमंतकीय जनतेने शांत रहावे. राज्यातील धार्मिकबल सलोखा अबाधित ठेवावा. तणावपूर्ण काळात चिथावणीच्या जाळ्यात अडकू नये’, असे आवाहनही त्यांनी केले.

गोव्यातील पत्रकारांची नैतिकता आणि शिष्टाचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी अशी सरसकट विधाने केवळ निराधारच नाहीत, तर सत्य, उत्तरदायित्व आणि जनसेवेची मूल्ये सातत्याने जपणाऱ्या या समुदायाचा तो घोर अपमान आहे, असे काँग्रेस समितीच्या प्रसारमाध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे. गोव्यातील प्रसारमाध्यमांनी नेहमीच निर्भीडपणे वस्तुस्थितीचे वार्तांकन करून आणि जनतेशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करून लोकशाही बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

प्रसारमाध्यमांनी अधोरेखित केलेल्या समस्यांचे निराकरण करण्याऐवजी, त्यांना बदनाम करण्याचे आणि त्यांची विश्वासार्हता धुळीस मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. खट्टर यांनी आपले विधान तात्काळ मागे घ्यावे आणि गोव्यातील प्रसारमाध्यम क्षेत्राची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.दरम्यान, ‘गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट्स’ने (गुज) गोव्यातील पत्रकारितेच्या नैतिकतेविषयी युट्यूबर गौतम खट्टर यांनी केलेल्या टिप्पणीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: गोव्यातील व्हिलांमधून 900 कोटींचे कथित सायबर रॅकेट! मुंबई पोलिसांची कारवाई; 22 जणांना अटक

Goa Liberation Day: मुक्तिदिनापूर्वी सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढणार! CM सावंतांची घोषणा; रवी नाईक यांच्या वारसदाराबाबत मौन

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT