Gautam Khattar: गौतम खट्टरच्या भावाला हरिद्वार येथे केले जेरबंद, मुख्य आरोपीविरोधात 'लुकआऊट' नोटीस

Gautam Khattar Brother Arrested: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत प्रक्षोभक आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गोवा गुन्हे शाखेने मुख्य आरोपी गौतम खट्टर याचा भाऊ माधव खट्टर याला हरिद्वार येथून अटक केली आहे.
Gautam Khattar
Gautam KhattarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत प्रक्षोभक आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गोवा गुन्हे शाखेने मुख्य आरोपी गौतम खट्टर याचा भाऊ माधव खट्टर याला हरिद्वार येथून अटक केली आहे. तर, गौतम खट्टर अद्याप फरार असून तो परदेशात पळून जाऊ नये यासाठी त्याच्याविरोधात ‘लुकआऊट’ नोटीस जारी केली आहे. यासंदर्भात ब्युरो ऑफ इमिग्रेशनलाही माहिती देण्यात आली आहे.

तपासादरम्यान गौतम खट्टरने कार्यक्रमात केलेले भाषण माधव खट्टर यानेच तयार केल्याचे समोर आले आहे. तसेच ते भाषण रेकॉर्ड करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यातही त्याचा सक्रिय सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या पुराव्यांच्या आधारे त्याला सहआरोपी करण्यात आले आहे.

Gautam Khattar
Goa Mining: विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात खाणकाम जोरात! 24 ठिकाणी खनिजाचा महालिलाव; सरकारला सुरुवातीलाच मिळणार 200 कोटींचा महसूल

कोलकाता येथेही दोन वर्षांपूर्वी तक्रार

गौतम खट्टरविरोधात यापूर्वी जुलै २०२४ मध्ये कोलकाता येथील न्यूटाऊन भागात आयोजित ‘नॅशनल युवा कॉनक्लेव्ह-२०२४’ या कार्यक्रमात जातीय आणि धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचा आरोप झाला होता. तसेच या प्रकरणी सिटिझन्स फॉर जस्टिस ॲण्‍ड पीस (CJP) या संस्थेने पोलिस व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यावेळी त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे समोर आले नव्हते.

Gautam Khattar
Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ हत्तीसाठी वनताराशी संपर्क! विश्वजीत राणे बंदोबस्तासाठी सरसावले; वन खाते ॲक्शन मोडमध्ये

वास्‍कोतील कार्यक्रमासाठी ५१ हजार रुपये फी

कार्यक्रम आयोजकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गौतम खट्टरच्या वास्‍कोतील कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आणि समन्वय माधवच पाहत होता. गौतमला कार्यक्रमासाठी आणण्यासाठी विमान तिकीट, निवास व्यवस्था तसेच ५१ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती, अशी माहितीही समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com