Gautam Khattar Dainik Gmantak
गोवा

Gautam Khattar: 9 दिवसांनी खट्टर गोव्‍यात; सहा दिवसांची पोलीस कोठडी, क्राईम ब्रँचने हिमाचलमधून केली अटक

Gautam Khattar Arrested: गौतम खट्टरला वास्‍को येथील न्‍यायालयासमोर उभे केले असता, त्‍याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्‍यात आली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: परशुराम जयंतीनिमित्त वास्‍कोतील कार्यक्रमात ‘गोंयचो सायब’ अशी जगभर ख्‍याती असलेल्‍या सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्‍याविषयी आक्षेपार्ह विधाने केलेल्या आणि त्‍यानंतर गायब झालेल्‍या कडवट विचारसरणीच्‍या गौतम खट्टरला अटक करीत क्राईम ब्रँचने रविवारी त्‍याला गोव्‍यात आणले. त्‍यानंतर वास्‍को येथील न्‍यायालयासमोर उभे केले असता, त्‍याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्‍यात आली.

वास्‍को येथील सनातन धर्म रक्षा समितीतर्फे परशुराम जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात खट्टर याने सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्‍याविषयी वादग्रस्‍त वक्तव्‍य केले होते. खट्टर याच्‍या या वक्तव्‍यामुळे धार्मिक सलोख्‍यासाठी देशभर प्रसिद्ध असलेल्‍या गोव्‍यात खळबळ माजली. विरोधी आमदारांनी यावरून राज्‍य सरकारवर टीकेची झोड उठवली, तर, ख्रिस्‍ती समुदायातील अनेकांनी खट्टरविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल करून त्‍याला तत्‍काळ अटक करण्‍याची मागणी लावून धरली होती.

या प्रकरणानंतर गोमंतकीयांचा खट्टरविरोधातील रोष वाढत असल्‍याचे लक्षात येताच मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्‍याच्‍याविरोधात कायदेशीर कारवाईची हमी देत, हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपवले होते. त्‍यानुसार क्राईम ब्रँचने खट्टर याच्‍या शोधासाठी पथकाची स्‍थापना केली होती.

या पथकाला खट्टर हिमाचल प्रदेशमधील कुल्लू येथे असल्‍याची माहिती मिळताच क्राईम ब्रँचचे निरीक्षक परेश नाईक, पोलिस उपनिरीक्षक माधव नाईक आणि हवालदार नवीन पालयेकर यांनी त्‍याला तेथे जाऊन अटक करीत तीन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर रविवारी दुपारी मोपा विमानतळावर आणले. त्‍यानंतर त्‍याला रायबंदर येथील गुन्हा शाखेत आणल्‍यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी गोमेकॉत नेले. वास्‍को येथील न्‍यायालयाने त्‍याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

गोव्‍यात ‘जय श्री राम’चा नारा

क्राईम ब्रँचचे पोलिस गौतम खट्टरला घेऊन गोव्‍यातील मोपा विमानतळावर पोहोचल्‍यानंतर पत्रकारांनी त्‍यांच्‍याशी संवाद साधण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यावर त्‍याने केवळ ‘सत्‍य की जीत होगी’ आणि ‘आप सभी को जय श्री राम’ असे म्‍हणत माध्यमांशी संवाद टाळला.

पोलिसांना देत होता हुलकावणी

१८ एप्रिल रोजी केलेल्‍या भाषणानंतर गोव्‍यात वाद सुरू झाल्‍यामुळे गौतम त्‍याच दिवशी गोव्‍यातून पसार झाला. त्‍यानंतर गोवा पोलिस मागावर असल्‍याचे समजताच त्‍याने हिमाचल प्रदेशमध्‍ये अनेक ठिकाणे बदलली होती. परंतु, गोवा पोलिसांनी त्‍याच्‍या शोधासाठी आधीच हिमाचल पोलिसांशी संपर्क केला होता. त्‍यांच्‍या मदतीने शनिवारी त्‍याला कुल्लू येथे अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT