Goa Road Accident: दुचाकींच्या धडकेत दोघेजण ठार, बागा येथील दुर्घटनेत अन्य दोघे जखमी; कामावरून घरी परतताना घाला

Baga Calangute Road Accident: बागा-कळंगुट येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला.
Baga Calangute Road Accident
Baga Calangute Road AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा : बागा-कळंगुट येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. अनिल उग्रेजिया (वय २७, मूळ गुजरात, सध्या रा. कांदोळी) आणि अरुण गोडीचा (वय २६, रा. गिरी) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात ठाणे-मुंबई येथील शशांक जाधव (वय ३६ वर्षे) आणि श्रीजी नायर (वय ३३ वर्षे) हे दोघे जखमी झाले आहेत.

हा अपघात रविवारी (ता. २६) पहाटे ५.१५च्या सुमारास बागा येथील हॉटेल रॉनिलजवळ घडला. अरुण गोडीचा आणि अनिल उग्रेजिया हे दोघेही जीए-०३-एक्यू-६६०२ क्रमांकाच्या दुचाकीवरून कळंगुटहून बागाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी जीए-०७-एजे-३८७२ क्रमांकाच्या स्कूटरवरून शशांक जाधव आणि श्रीजी नायर हे विरुद्ध दिशेने येत होते. बागा येथे शशांक याने समोरून येणाऱ्या अनिलच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

Baga Calangute Road Accident
Goa Drug Case: शाळेजवळ ड्रग्स विक्री; केरळच्या युवकाला अटक, अमलीपदार्थ विरोधी पथकाची मांद्रे येथे कारवाई

या अपघातात चौघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. जखमी अनिलला पोलिसांनी तातडीने कांदोळी आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. इतर तिन्ही जखमींना रुग्णवाहिकेतून गोमेकॉत हलविले. तेथे उपचार सुरू असतानाच दुपारी अरुणचा मृत्यू झाला. अन्य दोन जखमी शशांक आणि श्रीजी यांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला.

Baga Calangute Road Accident
Goa Govt Jobs: गोव्यात 709 पदांची मेगा भरती! 16 मेपासून सीबीटी परीक्षा; पोलिस खात्यात 596 जागा

मुंबईच्या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

कळंगुटचे पोलिस उपनिरीक्षक स्नेहल मळीक आणि साहाय्यक उपनिरीक्षक रवी गावस यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पोलिसांनी या अपघातास कारणीभूत ठरलेला चालक शशांक जाधव याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com