Gautam Khattar Dainik Gomantak
गोवा

गौतम खट्टर कोणत्‍याही क्षणी गजाआड! 'एफआयआर'नंतर अटकेसाठी पोलिस मागावर; सेंट फ्रान्‍सिस झेवियरविरोधी वक्तव्‍यांमुळे राजकारण तापले

St Francis Xavier Controversy: गौतम खट्टर याच्‍याविरोधात एफआयआर दाखल करत, त्‍याला अटक करण्‍याची तयारी पोलिसांनी केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ‘गोंयचो सायब’ म्‍हणून जगभर प्रसिद्ध असलेल्‍या सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्‍याबाबत वादग्रस्‍त वक्तव्‍य केलेल्‍या उजव्‍या विचारसरणीच्‍या गौतम खट्टर याच्‍याविरोधात एफआयआर दाखल करत, त्‍याला अटक करण्‍याची तयारी पोलिसांनी केली आहे. त्‍यामुळे खट्टर लवकरच गजाआड होऊ शकतो.

वास्‍कोतील कार्यक्रमानंतर एफआयआर दाखल होण्यापूर्वीच गौतम खट्टर याने गोवा सोडला होता. त्याचा शोध घेण्‍यासाठी एक पथक रवाना करण्‍यात येणार असून, त्‍याच्‍याविरोधात पोलिस स्‍थानकांत एकूण सहा तक्रारी आलेल्‍या आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक गुरुदास कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

परशुराम जयंतीनिमित्त शनिवारी वास्‍कोत आयोजित कार्यक्रमाला वक्ते म्‍हणून उपस्‍थित असलेल्‍या खट्टर याने सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्‍याबाबत वादग्रस्‍त वक्तव्‍ये केली होती.

बाहेरील वक्त्‍यांनी गोव्‍यात येऊन राज्‍यातील सामाजिक सलोखा बिघडवता कामा नये. कार्यक्रम आयोजकांनी त्‍यांना तशी समज देणे गरजेचे आहे. खट्टर याच्‍याविरोधात एफआयआर दाखल करण्‍यात आला असून, चौकशीनंतर त्‍याच्‍यावर योग्‍य ती कारवाई करण्‍यात येईल, अशी ग्‍वाही मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

गौतम खट्टर याच्या वक्तव्‍यांचा आपण जाहीर निषेध करतो. तो ज्‍यावेळी अशी वक्तव्‍ये करत होता, तेव्‍हा आपण त्‍याला रोखण्‍याचा दोनवेळा प्रयत्‍न केला. परंतु, उपस्‍थितांनी त्‍याला रोखू दिले नाही. पुन्‍हा प्रयत्‍न केले असते तर तेथे वाद निर्माण झाला असता. त्‍यामुळे आम्‍ही गप्‍प बसलो, असे मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

गौतम खट्टर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके पाठविण्यात येतील. या प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. गुन्हा नोंदविण्यापूर्वीच गोव्याबाहेर निघून गेल्याने त्याला अटक करता आली नाही. - गुरुदास कदम, पोलिस अधीक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tiger Death: वाघाच्या मृत्यूनं खळबळ! खाणींच्या विळख्यात संपतोय 'जंगलाचा राजा'? पण वनखात्याची सोयीस्कर अनास्था

Cutbona Jetty: 100 बोटी, 3000 लोक पण मूलभूत सोयी शून्य! कुटबण जेटीवर आरोग्याचा प्रश्न झाला गंभीर, आमदारांनी दिला समस्या सोडवण्याचा शब्द

Bicholim Fish Price Hike: मान्सूनपूर्वी मासळीचे दर कडाडले! डिचोलीत ‘सुरमई’चा तोरा; मत्स्यखवय्यांच्या खिशाला कात्री

खरी कुजबुज: काँग्रेस आमदार कुणीकडे?

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! 8 व्या वेतन आयोगात 3.83 फिटमेंट फॅक्टरची मागणी, पगारात 283 टक्क्यांची वाढ होणार?

SCROLL FOR NEXT