Cutbona Jetty: 100 बोटी, 3000 लोक पण मूलभूत सोयी शून्य! कुटबण जेटीवर आरोग्याचा प्रश्न झाला गंभीर, आमदारांनी दिला समस्या सोडवण्याचा शब्द

Cutbona Jetty Infrastructure Issues: कुटबण जेटीवरील अस्वच्छता, पाणीटंचाई आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मच्छीमार, बोटमालक आणि मजूर वर्ग त्रस्त झाला.
Cutbona Jetty Infrastructure Issues
Cutbona JettyDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: कुटबण जेटीवरील अस्वच्छता, पाणीटंचाई आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मच्छीमार, बोटमालक आणि मजूर वर्ग त्रस्त झाला असून नव्या मासेमारी हंगामापूर्वी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. नुकत्याच झालेल्या पाहणीत जेटीवरील अनेक त्रुटी समोर आल्याने १ जून ते ३१ जुलैदरम्यानच्या ६१ दिवसांच्या मासेमारी बंदी काळातच दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आमदार क्रुझ सिल्वा यांनी जेटीची पुन्हा पाहणी करून मत्स्यव्यवसाय खात्याच्या निदर्शनास सर्व समस्या आणल्या जाणार असल्याचे सांगितले. पुढील मासेमारी मोसम सुरू होण्यापूर्वी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दररोज सुमारे १०० बोटी या जेटीवरून समुद्रात जातात. बोटमालक संघटनेचे प्रतिनिधी सावियो डिसिल्वा यांनी जेटीवरील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत दर दोन दिवसांनी साफसफाई करण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा खंडित झाल्याने शौचालये बंद ठेवावी लागली होती. सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला तरी जेटीवर काम करणाऱ्या अडीच ते तीन हजार मजुरांसाठी नियमित पाणीपुरवठा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Cutbona Jetty Infrastructure Issues
Goa Cutbona Jetty: कुटबण जेटीवर अस्वच्छतेचे साम्राज्य! आरोग्य खात्याच्या पाहणीत अनेक त्रुटी उघड; पाणीपुरवठ्या अभावी कामगारांचे हाल

दरम्यान, ‘गोवा कॅन’चे निमंत्रक रोलंड मार्टिन्स यांनी जेटीवरील स्वच्छता आणि शौचालय व्यवस्थापनासाठी स्वतंत्र एजन्सी नियुक्त करण्याची मागणी केली. मासळी उत्पादन घटल्याने यंदाचा हंगाम तोट्यात गेल्याची खंतही बोटमालकांनी व्यक्त केली आहे.

Cutbona Jetty Infrastructure Issues
Cutbona Jetty: कुटबण जेटीवरील 3 डिंगी बोटी जप्‍त! मच्छीमार खात्याची कारवाई; अवैधरीत्या पार्क केल्याने दणका

ओपीडी सुविधा सुरू करावी

मजुरांच्या आरोग्याच्या दृष्टीने जेटीवर ओपीडी सुविधा सुरू करण्याची मागणी होत आहे. याबाबत आरोग्य केंद्रातील डॉक्टरांशी चर्चा झाल्याचेही मार्टिन्स यांनी सांगितले. तसेच, जेटीवर अधिकृत कॅन्टीन सुविधा नसताना काही ठिकाणी बेकायदेशीर दुकाने सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com