Gauri Achari Murder Case  Dainik Gomantak
गोवा

Gauri Achari Case: गौरी आचारी खूनप्रकरणातील संशयित गौरव बिद्रेच्या जामिनावर 2 मार्चला सुनावणी

गोमंतक ऑनलाईन टीम

Gauri Achari Case: गौरी आचारी खूनप्रकरणातील संशयित गौरव बिद्रे याने केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी त्याच्या वकिलांनी वेळ घेतल्याने ती आता येत्या 2 मार्चला ठेवण्यात आली आहे. या जामीन अर्जामध्ये गौरी हिच्या वडिलांनी हस्तक्षेप अर्ज सादर केला आहे. संशयिताला जामीन दिला जाऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे.

जुने गोवे पोलिसांनी संशयित गौरव बिद्रे याच्याविरुद्ध खुनाच्या व पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. त्यावरील सुनावणी न्यायालयात प्रलंबित आहे. त्याने जामिनासाठी सादर केलेल्या अर्जात त्याने खून केला नसून रागाच्या भरात त्याच्या हातून ही घटना घडली आहे.

दोघांचेही मैत्रीचे संबंध होते त्यामुळे तिला ठार मारण्याचा हेतू नव्हता. दोघामध्ये झालेल्या झटापटीच्यावेळी नकळत हा प्रकार घडला, असे म्हटले आहे. तिचा मृत्यू झाल्याने भयभीत होऊन तिचा मृतदेह झाडाझुडपात लपवण्याचा प्रयत्न केला. त्याचे कुटुंब असून तो एकमेव कर्ता पुरूष आहे. त्यामुळे न्यायालयाने सशर्त जामीन द्यावा अशी विनंती त्याने केली होती.

पोलिसांनी बिद्रेला जामीन देण्यास विरोध केला आहे. त्याने एका निष्पाप तरुणीचा खून नियोजनपुर्वक केला आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईतही गुन्हा नोंद आहे. त्यामुळे त्याची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची आहे.

त्याच्याविरुद्ध न्यायालयात दाखल झालेल्या आरोपपत्रावरील सुनावणी सुरू झालेली नाही. त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये, असे उत्तर पोलिसांनी दिले आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच गौरव बिद्रे याला कोलवाळ कारागृहातील कैद्यांनी मारहाण केली होती. त्याप्रकरणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश शेरीन पॉल यांनी तुरूंगाधिकाऱ्यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते.

या मारहाणीत बिद्रे याचे समोरील दोन दात तुटले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने त्याला कारागृहातील इतर खोलीत हलवण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती त्याने न्यायालयाला केली होती. तसेच दात तुटल्याने त्यावरील उपचारासंबंधी निर्देश द्यावेत, अशी विनंती केली होती ती न्यायालयाने स्वीकारली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT