Goa Drugs Seized: शिवोलीत 2.55 लाखांचे ड्रग्ज जप्त; बंगळूरच्या एकाला अटक

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाचा छापा
Goa Drugs Seized
Goa Drugs SeizedDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Drugs Seized: उत्तर गोव्याच्या बार्देश तालुक्यातील शिवोली येथे पोलिसांनी अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी बंगळुरच्या एका युवकाला अटक केली आहे. त्याच्याकडून 2.55 लाख रूपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

Goa Drugs Seized
Goa Crime: जीव भांड्यात पडला! तब्बल 8 तासांच्या शोधमोहिमेनंतर जंगलात सापडला अपहरण झालेला चिमुरडा...

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली. पथकाला ड्रग्ज तस्करीबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने शिवोलीत छापा टाकला. शरण डेम्बला (वय 36) असे अटक करण्यात आलेल्या संशय़िताचे नाव आहे. तो मूळचा मल्लेश्वरम बंगळूरचा (कर्नाटक) आहे.

त्याच्याकडे 50 ग्रॅम चरस, 500 ग्रॅम गांजा, 8 ग्रॅम एक्स्टॅसी पावडर आणि 10 ग्रॅम मेथाम्फेटामाईन आढळून आले आहे. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्व अमली पदार्थांची जागतिक बाजारपेठेतील किंमत सुमारे 2 लाख 55 हजार रूपये इतकी होते.

दरम्यान, गोव्यातील ड्रग्ज व्यवसाय किनारपट्टीपासून आता खेड्यापाड्यात पोहचला आहे. या व्यवसायात अटक केलेल्यामध्ये 30 टक्के पेडलर्स हे गोमंतकीय आहेत. मागच्या वर्षभरात एकूण 56 गोवेकरांना अटक करण्यात आली आहे.

Goa Drugs Seized
Goa Temperature: गोव्यात सोमवारी नोंदवले गेले देशातील सर्वाधिक तापमान

काही दिवसांपुर्वीच शिवोलीतील नितीन बाणावलीकर (44) याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून 2 लाख 4 हजारांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. हणजुणे पोलिसांनी ही कारवाई केली होती. या छाप्यात पोलिसांना 23.4 ग्रॅम सायकोट्रॉपिक ड्रग्ज आढळून आले होते.

गेल्या वर्षभरात गोवा पोलिसांनी अमली पदार्थ व्यावसायिकावर एकूण 153 गुन्हे दाखल केले आहेत. यात 184 संशयितांना अटक करण्यात आली आहे. यातील 28 विदेशी नागरिक असून 56 गोवेकर आहेत. तर 102 इतर राज्यातील नागरिक आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com